आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लक्ष्मी'ला झटका:प्रीमिअरपूर्वीच ऑनलाईन लीक झाला अक्षय-किआराचा चित्रपट, निर्मात्यांनीही एक तासाआधीच केला रिलीज

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट 9 ऑक्टोबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला.

अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर 'लक्ष्मी' हा चित्रपट प्रीमियरच्या आधी ऑनलाइन लीक झाला. अनेक टोरेंट वेबसाइटवर हा चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये डाउनलोड करता येत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट 9 ऑक्टोबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला. खरं तर हा चित्रपट संध्याकाळी 7.05 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, प्रेक्षकांची उत्सुकता पाहता निर्मात्यांनी तो एक तासआधी म्हणजे 6 वाजताच प्रदर्शित केला.

प्रदर्शनापूर्वीच अनेक वादात अडकला चित्रपट
राघव लॉरेन्स दिग्दर्शित लक्ष्मी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासून सातत्याने चर्चेत आला होता. या चित्रपटाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या चित्रपटावर लव्ह जिहाद, धार्मिक भावना दुखावणे असे अनेक आरोप करण्यात आले होते. त्यासोबतच या चित्रपटाच्या नावावरदेखील आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव बदलून ‘लक्ष्मी’ हे नवीन नाव ठेवण्यात आले.

काय आहे चित्रपटाची कथा?
चित्रपटाची कहाणी आसिफ (अक्षय कुमार) नावाच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते, जो प्रिया (कियारा अडवाणी) या मुलीच्या प्रेमात पडला आहे. कथेत तेव्हा ट्विस्ट येतो जेव्हा आसिफ प्रियाच्या घरातील सदस्यांचा लग्नासाठी होकार मिळवण्यासाठी तिच्या घरी जातो आणि तेथे एक आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करते. त्यानंतर पुढचे कथानक घडते. अक्षयने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत लक्ष्मीसारखी भूमिका केली नव्हती.

'कांचना'चा हिंदी रिमेक
राघव लॉरेन्स दिग्दर्शित 'लक्ष्मी' हा चित्रपट 'कांचना' या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. राघव यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की 'कांचना' अर्थ सोने होते, जे लक्ष्मीचे एक रूप आहे. म्हणून त्याने हिंदी रिमेकला 'लक्ष्मी' असे नाव दिले. 'कांचना'मधील मुख्य पात्र स्वतः राघव लॉरेन्स यांनी साकारले होते.

बातम्या आणखी आहेत...