आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्षय कुमार आणि सोनू सूद यांनी पुन्हा एकदा 'पृथ्वीराज'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अक्षय कुमारचा सेटवरील एक्सक्लुझिव्ह फोटो दिव्य मराठीला मिळाला आहे. चित्रपटाच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितल्यानुसार, 30 नोव्हेंबरपर्यंत हे वेळापत्रक चालू राहिल. सध्या यशराज स्टुडिओत शूटिंग सुरू आहे, उर्वरित शूटिंग लवकरच मुंबईच्या मड आयलँडमध्ये सुरु केले जाईल.
कोरोनामुळे शेड्यूल लांबले
चित्रपटाचे दीर्घ वेळापत्रक आहे. सेटवर प्रत्येकाची नियमित कोरोना चाचणी होतेय. क्रू मेंबर्सचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना स्टुडिओमध्ये एन्ट्री दिली जात आहे. त्यांची जवळच्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिवाळीनंतर संजय दत्त करणार शूट सुरु
या चित्रपटात संजय दत्त देखील मुख्य भूमिकेत आहे. तो मोहम्मद गौरीच्या भूमिकेत आहे. सध्या त्याची इम्यूनोथेरपी चालू आहे. त्यामुळे त्याचे शेड्यूल दिवाळीनंतर ठेवले आहे. सध्या अक्षय कुमार, सोनू सूद आणि मानव विज यांचे सिक्वेन्स पूर्ण केले जात आहेत. 13 तारखेपासून मानुषी छिल्लरदेखील शूटचा एक भाग असेल.
लॉकडाऊनच्या आधी बरेच शूटिंग पूर्ण झाले
सेटवरील एका सूत्राने सांगितले की, “चित्रपटाचा बराचसा भाग मार्चमध्ये लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी शूट करण्यात आला होता. जयपूरमधील राजा-महाराजांच्या वाड्यांच्या बाह्य भागांचे पुरेसे स्टॉक फुटेज आहे. उर्वरित भागाचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी वायआरएफ स्टुडिओमध्ये मोठा सेट डिझाइन केला गेला आहे. येथील आतील भाग जयपूरच्या बाह्य शॉटमध्ये मर्ज केले जाईल. "
दिग्दर्शकानेही शूटिंग सुरु झाल्याबद्दल दुजोरा दिला
याबद्दलचा जाणून घेण्यासाठी आम्ही चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्याकडे संपर्क साधला. त्यांनी याची पुष्टी केली. ते म्हणाले, "होय, आम्ही वायआरएफ स्टुडिओमध्ये पृथ्वीराजचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे आणि संपूर्ण टीम यामुळे खूप एक्सायटेड उत्सुक आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.