आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या खिलाडीला पडली रीलची भूरळ:टायगर श्रॉफसह 'मैं खिलाडी तू अनारी' गाण्यावर थिरकला, 'सेल्फी'चे केले प्रमोशन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार लवकरच 'सेल्फी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात अक्षय इम्रान हाश्मीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करतोय. या चित्रपटात अक्षयच्या गाजलेल्या 'मैं खिलाडी तू अनारी' या लोकप्रिय गाण्याचे रिमिक्स व्हर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या गाण्यात अक्षयने इम्रान हाश्मीसोबत ताल धरला आहे. आता याच गाण्यावर अक्षय बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हीरो टायगर श्रॉफसोबत थिरकताना दिसला आहे. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर टायगरसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.

खरं तर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ लवकरच 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. बॉलिवूडच्या या दोन्ही अ‍ॅक्शन हिरोला मोठ्या पडद्यावर एकत्र बघण्यास त्यांचे चाहते उत्सुक आहेत. तत्पूर्वी दोघांना 'मैं खिलाडी तू अनारी' या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही.

या डान्स व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आणि टायगर यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. ब्लॅक लूकमध्ये दोघेही डॅशिंग दिसत आहेत. तसेच दोघांनी अप्रतिम डान्स केला आहे. त्यांच्या डान्स स्टेप पाहून चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अक्षयने या रीलच्या माध्यमातून आपल्या आगामी 'सेल्फी' चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत या गाण्यावर रील बनवा, ती रील मी रिपोस्ट करेन, असे अक्षयने ही रील शेअर करत कॅप्शनमध्ये सांगितले आहे.

'सेल्फी' या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले असून करण जोहर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट पृथ्वीराजच्या 'ड्रायव्हिंग लायसन्स' या चित्रपटाचा रिमेक आहे. डायना पेंटी आणि नुसरत भरुच्चा यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत. हा चित्रपट 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

यावर्षी येणार 'बडे मियाँ छोटे मियाँ’

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ डेव्हिड धवन यांचा हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता याच सुपरहिट चित्रपटाचा रिमेक होणार असून यात टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पूजा एंटरटेनमेंटने फेब्रुवारी 2022 मध्ये या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात पृथ्वीराज हा दाक्षिणात्य अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहे, ज्याने यापूर्वी ‘टायगर जिंदा है’सारखे चित्रपट दिले आहेत. हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर असेल जो हिंदीसह तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. हा यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...