आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार केदारनाथ धामला पोहोचला आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. अक्षयने केदारनाथ मंदिरात पोहोचून महादेवाचे आशीर्वाद घेतले. व्हिडिओमध्ये अभिनेता त्याच्या सुरक्षा पथकासह मंदिरात जाताना दिसत आहे.
अक्षयला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती
प्रवासादरम्यान, अभिनेता ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. अक्षयने कपाळावर लाल आणि पिवळा टिळा लावला आहे. या अभिनेत्याची झलक मिळवण्यासाठी बाबा केदारनाथच्या धामवर मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. यादरम्यान अक्षय मंदिरातून बाहेर आला आणि चाहत्यांना हात जोडून अभिवादन केले.
चित्रपटाच्या शूटिंगसाठी डेहराडूनला पोहोचला
अक्षय सध्या त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी डेहराडूनमध्ये आहे. मंगळवारी अभिनेता हेलिपॅडवरून केदारनाथ धामला पोहोचला.
अक्षय कुमारने शेअर केला फोटो
यापूर्वी अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर केदारनाथ मंदिराचा फोटो शेअर केला होता. ही पोस्ट शेअर करत त्याने 'जय बाबा भोलेनाथ' असे कॅप्शन लिहिले आहे. अभिनेत्याच्या या फोटोला चाहते प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत.
अक्षय कुमारचे आगामी प्रोजेक्ट्स
अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यापूर्वी तो इमरान हाश्मीसोबत सेल्फीमध्ये दिसला होता. यात डायना पेंटी आणि नुसरत भरुचाही होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. आता अक्षयकडे 'कॅप्सूल गिल', 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'ओह माय गॉड 2' असे चित्रपट आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.