आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. त्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याच्यावर पुढच्या वर्षी चित्रपट, जाहिरात आणि वेब सीरिज मिळून 1500 कोटी रुपये लावले आहेत. निर्माते आणि व्यापार विश्लेषकांच्या मते, अक्षयच्या खात्यात 8 ते 9 चित्रपट आहेत, तर बऱ्याच जाहिराती आणि एक मोठ्या बजेटची वेब सीरिजदेखील आहे. या चित्रपटांमध्ये ‘सूर्यवंशी’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’, ‘राम सेतु’, ‘ओह माय गॉड 2’, ‘मिशन सिंड्रेला’ यांचा समावेश आहे. यांची घोषणादेखील झाली आहे. ‘राम सेतु’ आणि ‘मिशन सिंड्रेला’चे शूटिंग बाकी आहे. तर काही प्रदर्शित होणार आहेत. या शिवाय ‘दोस्ताना 2’ मध्येही तो दिसू शकतो. राज मेहता आणि प्रियदर्शनव्यतिरिक्त चंद्रप्रकाश द्विवेदींच्या एका चित्रपटाचीदेखील लवकरच घोषणा होणार आहे. एवढेच नव्हे तर अक्षयच्या खात्यात मुदस्सर अजीज यांचा एक चित्रपटदेखील आल्याची बातमी आहे. ज्याचे नाव ‘2 एक्सएल’ आहे, त्यात सोनाक्षी सिन्हा आहे.
प्रत्येक प्रोजेक्टमधून मिळतात 175 ते 200 काेटी रुपये
अक्षयच्या प्रत्येक प्राेजेक्टकडून निर्मात्याला 175 ते 200 कोटींपर्यंतची कमाई होते. कारण त्याच्या चित्रपटाचे सॅटेलाइट आणि डिजिटल अधिकार 125 कोटीत विकले जातात. 15 कोटी म्युझिक कंपन्या देतात. 45 ते 55 कोटींमध्ये रिलीजच्या आधी वितरकांकडून थिएटरच्या अधिकाराचे येतात. परदेशी बाजारांकडून साधारणपणे 10 ते 15 कोटी अधिकार मिळताे. अक्षय पूर्ण रिकव्हरीच्या 80 टक्के घेतो हे निश्चितच, परंतु त्याचे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी नफ्यात असतात, म्हणून निर्माते आणि फायनान्सर त्याच्या चित्रपटांवर पैसे लावतात. म्हणूनच त्याच्यावर उद्योगातून 1500 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
चाहते आणि सिनेप्रेमींना वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट देतो अक्षय
अक्षय म्हणजे हिट असा त्याचा फॉर्म्युला झाला आहे. त्यामुळे तो इतर कलाकारांपेक्षा वेगळा ठरतो. एकीकडे तो ‘पृथ्वीराज’ ऐतिहासिक चित्रपट करतो तर दुसरीकडे ‘गोल्ड’ आणि ‘रुस्तम’सारखा पीरियडदेखील करतो. ‘रक्षाबंधन’ आणि ‘रामसेतु’सारखा सामाजिक बांधिलकीचा आणि कौटुंबिक चित्रपटदेखील त्याच्या खात्यात आहेत. शिवाय ‘सूर्यवंशी’मध्ये तो आपल्या अॅक्शन रूपात दिसणार आहे. अक्षय आपल्या चाहत्यांना आणि सिनेप्रेमींना व्हरायटी चित्रपट देत आहे. शिवाय अक्षय शिस्तप्रिय असल्यामुळे तो निर्मात्यांना आवडतो. इंडस्ट्रीच्या इतर अभिनेत्यापेक्षा तो वर्षात तीन ते चार चित्रपट करत असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांचा पैसाही खेळता राहतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.