आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलदार खिलाडी:कोरिओग्राफर गणेश आचार्यने बर्थडे गिफ्टमध्ये मागितला 3600 डान्सर्ससाठी महिनाभराचा किराणा, अक्षय कुमारने लगेच दिला होकार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी मागितली होती मदत

अक्षय कुमार कोरोना संकट आणि लॉकडाउनमुळे अडचणीत आलेल्या लोकांची सतत मदत करत असतो. नुकतेच तो नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांना मदत करण्यासाठी 3600 नर्तकांना महिन्याचा किराणा देण्यासाठी पुढे आला आहे. हे सर्व नर्तक गणेश आचार्य यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. एका नर्तकाच्या मते, त्याला दोन पर्याय दिले आहेत. एकतर त्याच्या खात्यात महिनाभराची रक्कम घेऊ शकताे किंवा कुटूंबासाठी किराणा घेऊ शकतो.

गणेश आचार्य यांनी मागितली होती मदत
अक्षयविषयी बोलताना गणेश आचार्य यांनी एका मुलाखतीत सांगितले, 'अक्षय खूप दयाळू आहे. काल माझा 50 वा वाढदिवस होता. या प्रसंगी मला कोणती भेट हवी आहे, हेे त्यांनी मला विचारले. मी
1600 ज्युनिअर कोरिओग्राफर्स व सीनियरला मदत करू शकतात का? नर्तक आणि 200 नवीन नर्तकांना महिन्याचे राशन देण्यासाठी तो पटकन तयार झाला.'

गणेश आचार्य यांनी पुढे सांगितले, 'माझी पत्नी गणेश आचार्य फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजुंसाठी काम करत आहे. ती स्वतः पॅकिंग आणि वितरणाचे काम बघत आहे. जे डान्सर्स आणि कोरिओग्राफर्स आमच्याकडे नोंदणीकृत आहेत, ते एक महिन्याचा किराणा किंवा पैसे घेऊ शकतात. निर्णय त्यांचा असेल.'

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून मदत करतोय अक्षय
कोरोना काळात अक्षय सुरुवातीपासून मदत करतोय. मागील महिन्यात त्याने गौतम गंभीर फाऊंडेशनला एक कोटींची मदत केली होती. याशिवाय त्याने गरजूंपर्यंत ऑक्सिजन सिलिंडर आणि कॉन्सट्रेटर
पोहोचवले होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याने पीएम केअर्स फंडात 25 कोटींची देणगी दिली होती. याशिवाय बीएसीला पीपीई किट खरेदीसाठी तीन कोटी रुपये दिले होते. मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी अक्षयने दोन कोटी रुपये दिले होते. इतकेच नाही तर स्थलांतरीत मजुरांपासून ते इंडस्ट्रीतील फोटोग्राफर्सपर्यंत अक्षयने आर्थिक मदत पोहोचवली होती.

बातम्या आणखी आहेत...