आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Akshay Kumar Charges Rs 27 Crore For The Shooting Of Just Two Weeks In Atrangi Re, Will Be Seen In The Special Role In Film With Sara And Dhanush

अपकमिंग:'अतरंगी रे' चित्रपटात केवळ दोन आठवड्यांच्या शूटिंगसाठी अक्षय कुमारने घेतले 27 कोटी रुपये, सारा - धनुष स्टारर चित्रपटात अक्कीची खास भूमिका

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड इंडस्ट्रीत सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता अक्षय कुमार सध्या आपल्या बॅक-टू-बॅक चित्रपटांसाठी चर्चेत आहे. अभिनेता लवकरच बेलबॉटम चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परदेशात जात आहे, त्यानंतर तो आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या धनुष-सारा स्टारर चित्रपटात अक्षयची खास भूमिका असणार आहे, त्यासाठी अभिनेत्याने 27 कोटी रुपये घेतले आहेत. आश्चर्य म्हणजे शूटिंगच्या दोनच आठवड्यांसाठी त्याने ही फी घेतली आहे.

नुकतेच पिंगविलाने सूत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे की, आनंद एल राय या चित्रपटासाठी एक आघाडीचा अभिनेता शोधत होते जो चित्रपटामध्ये पाहुण्यांच्या भूमिकेत दिसू शकेल. या चित्रपटात त्याचे पात्र महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. अक्षयच्या आधी त्याने हृतिक रोशनला ही भूमिका ऑफर केली होती पण त्याने नकार दिला. अक्षय चित्रपट निर्मात्याचा आदर करतो म्हणून त्याने ही ऑफर स्वीकारली. या चित्रपटासाठी अक्कीला अवघ्या दोन आठवड्यांसाठी शूटिंग करायचं आहे. अक्षय पुढील महिन्यात बेलबॉटमच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना होणार आहे, तिथून परत येईल आणि अतरंगी रे चित्रपटासाठी शूट करणार आहे.

9 नंबर अक्षयसाठी लकी 

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, अक्षयने या चित्रपटासाठी 27 कोटींची मोठी रक्कम घेतली आहे. अक्षयचा लकी नंबर 9 आहे. म्हणून तो जास्तीत जास्त फिल्ममध्ये अशी फिस घेतो की, ज्याची टोटल नऊ असेल. यापूर्वी अक्षय चित्रपटांमधील कॅमिओ भूमिकांसाठी एखा दिवसाचे 1 कोटी रुपये घेत होता, पण आनंद एल रायच्या चित्रपटात त्याला दुप्पट फी दिली जात आहे. त्याचे शूटिंगचे वेळापत्रक अवघ्या 14 दिवसांचे आहे आणि यासाठी तो 27 कोटी रुपये घेत आहे.

हे आहेत अक्षयचे आगामी चित्रपट 

लॉकडाऊन दरम्यान शूटिंग करणारा अक्षय बॉलीवूडचा पहिला अभिनेता आहे. यासह अक्षयने परदेशात शूटिंगला हो म्हणून सांगितले आहे. ऑगस्टमध्ये बेलबॉटम चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेता चार्टर्ड विमानाने लंडनला जाणार आहे. या चित्रपटातून परतल्यानंतर अभिनेता अतरंगी रे चित्रपटासाठी 14 दिवस शुटिंग करणार आहे. लवकरच अभिनेता मिस वर्ल्ड पृथ्वीराजवर मानुषी छिल्लरबरोबर काम सुरू करणार आहे. आगामी रिलीजविषयी बोलताना अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. दुसरीकडे, रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशीचा रिलीज देखील कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला आहे.