आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठ्या मनाचा खिलाडी:अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे; गौतम गंभीर फाऊंडेशनला दिले 1 कोटी रुपये

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गौतम गंभीरने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन दिली माहिती

अभिनेता अक्षय कुमार हे नेहमी कोणालाही मदत करण्यासाठी पुढे येत असतात. देशात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशात सध्या ऑक्सिजनसह अत्यावश्यक सुविधांचा अभाव दिसून येत आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी गौतम गंभीर फाऊंडेशनला 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यासंदर्भांतील माहिती शनिवारी भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि आता राजकारणात सक्रीय असणारा गौतम गंभीरने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन दिली.

गौतम गंभीर यांनी ट्विटमध्ये हे म्हटले
गंभीर यांनी आपल्या ट्विटमध्ये हे म्हटले आहे की, "या निराशेतील प्रत्येक मदत आशेचा किरण म्हणून येते. गौतम गंभीर फाउंडेशनला गरजूंसाठी अन्न, औषधे आणि ऑक्सिजनसाठी एक कोटी रुपये दिल्याबद्दल अक्षय कुमार यांचे मनापासून आभार."

मी मदत करु शकलो म्हणून आनंदी आहे - अक्षय

गौतमच्या पोस्टला उत्तर देताना अक्षयने लिहिले, "गौतम गंभीर हा खरोखर कठीण काळ आहे. मी मदत केली याचा मला आनंद आहे. आशा आहे की आम्ही लवकरच या संकटातून मुक्त होऊ. सुरक्षित राहा."

बातम्या आणखी आहेत...