आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुपरस्टार अक्षय कुमारने कोरोनव्हायरस आणि लॉकडाऊनच्या या संकटाच्या काळात अनेक मदत कार्यात कोट्याधी रुपयांची देणगी दिली आहे. आता त्याने रोजंदारी मजुरांना मदत करण्यासाठी सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिन्टा) ला 45 लाख रुपयांचे योगदान दिले आहे. याची पुष्टी सिन्टाचे वरिष्ठ सहसचिव अमित बहल यांनी केली आहे.
अमित एका बातचीतमध्ये म्हणाले, "या कठीण काळात मदती केल्याबद्दल आम्ही अक्षयचे खूप आभारी आहोत. हा पुढाकार कार्यकारी समितीचे सदस्य आणि अभिनेता अयूब खान यांनी घेतला. अभिनेता जावेद जाफरी यांच्या माध्यमातून त्यांनी साजिद नाडियाडवाला आणि अक्षय कुमार यांना मदत मागितली होती."
अमित पुढे म्हणाले, "अक्षयने उशीर नकरता आमच्याकडे सदस्यांची यादी मागितली. त्यानंतर आम्हाला दररोज 1500 मजुरांकडून कृतज्ञतेचे संदेश आले आहेत, ज्यांना अक्षयने मदत केली आहे." अमित यांच्या म्हणण्यानुसार अक्षय आणि निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी प्रत्येक सदस्याच्या खात्यात 3000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. सदस्यांना मदत करण्यासाठी आवश्यक ते सर्व करू असे त्यांनी आश्वासनदेखील दिल्याचे अमित यांनी सांगितले.
यापूर्वी अक्षय कुमारने कोविड 19 बरोबरच्या लढ्यासाठी पीएम केयर्स फंडात 25 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. याशिवाय त्याने मास्क, पीपीई आणि रॅपिड फायर किट खरेदी करण्यासाठी बीएमसीला 3 कोटी रुपये दिले. त्याने मुंबई पोलिस फाऊंडेशनमध्येही दोन कोटी रुपये जमा केले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.