आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षयची फी वाढली:लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमारची फी 36 कोटींनी वाढली, आता एका चित्रपटासाठी घेणार तब्बल 135 कोटी रुपये

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांमध्ये सुर्यवंशी, अतरंगी रे, पृथ्वीराज, रामसेतू, मिशन लॉयन आणि रक्षाबंधन यांचा समावेश आहे.

वर्षाला 3 ते 4 चित्रपटांत दिसणारा अभिनेता अक्षय कुमारकडे बॉलिवूडमध्ये यशाची हमी म्हणून पाहिले जाते. तो एक अतिशय बिझी असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. लॉकडाऊनमध्ये शूटिंग बंद असताना त्याने या वेळेचा सदुपयोग स्क्रिप्ट वाचण्यासाठी आणि त्याला अंतिम रुप देण्यासाठी केला. वृत्तानुसार अक्षयने याकाळात पुढील दोन वर्षांचे चित्रपटच फायनल केले नाहीत, तर आपल्या मानधनात देखील वाढ केली आहे,

2022 मध्ये एका चित्रपटासाठी 135 कोटी रुपये घेणार अक्षय
बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, लॉकडाऊनच्या काही महिन्यांतच अक्षयने आपली फी 98 कोटींवरून वाढवून 108 कोटी केली आहे. त्यानंतर त्याने अलीकडेच साइन केलेल्या चित्रपटासाठी 117 कोटी रुपये घेतले. हे चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. त्याचबरोबर 2022 मध्ये प्रदर्शित होणा-या चित्रपटांसाठी तो फी म्हणून 135 कोटी रुपये घेणार आहे.

प्रत्येक निर्मात्याला अक्षयला कास्ट करायचे आहे
याच वृत्तानुसार, कमी जोखीम, कमी बजेट, आश्वासन रिटर्न मॉडेल आणि बाजारात असलेली अक्षयची मागणी या गोष्टींना लक्षात घेता प्रत्येक निर्माता अक्षयला आपल्या चित्रपटात घेऊ इच्छितो आहे. हे बघता अक्षयने 2022 मध्ये प्रदर्शित होणा-या आपल्या सर्व चित्रपटांसाठीचे मानधन वाढवून ते 135 कोटी केले आहे.

बजेट किती असेल आणि कलेक्शन कसे असेल?
अक्षयच्या बर्‍याच चित्रपटांचे प्रॉडक्शन बजेट 35 ते 45 कोटींच्या दरम्यान असेल. याशिवाय 15 कोटी रुपये प्रिंट आणि प्रसिद्धीसाठी खर्च केले जातील. एकंदरीत या चित्रपटाचे एकुण बजेट 50 ते 60 कोटी रुपये असेल. त्याचबरोबर यात अक्षयच्या फीचा समावेश केला तर हे बजेट 185 ते 195 कोटी इतके असेल. आता जर चित्रपटाच्या कलेक्शन बद्दल बोलायचे झाल्यास सॅटेलाइट आणि डिजिटल राइट्समधून जवळपास 80 ते 90 कोटी रुपये मिळतील. म्युझिक राइट्समधून सुमारे 10 कोटींची कमाई होईल. त्याचबरोबर भारतातील बॉक्स ऑफिस कलेक्शन 210 ते 220 कोटी असेल.

मित्राला मानधनात दिली 20% सूट

असेही म्हटले जाते की, अक्षयने त्याचा निर्माता मित्र साजिद नाडियाडवालाला मार्केट रेटनुसार त्याच्या फी मध्ये 20% ची विशेष सूट दिली आहे. कारण साजिद मोठ्या प्रमाणात चित्रपट बनवण्याच्या विचारात आहे आणि चित्रपट निर्मात्याच्या डोक्यावरील ओझे होऊ नये, असे अक्षयला वाटते.

बातम्या आणखी आहेत...