आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आता फॅशन इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे. त्याने स्वतःचा फॅशन ब्रँड लाँच केला आहे. फोर्स IX असे त्याच्या ब्रँडचे नाव आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना अक्षयने केवळ त्याच्या ब्रँडबद्दलच सांगितले नाही तर स्वतःची घराची झलकही दाखवली आहे. खिलाडी कुमारने पहिल्यांदाच घरातील एखादा व्हिडिओ शेअर केला आहे.
पहिल्यांदाच शेअर केली आलिशान घराची झलक
व्हिडिओच्या सुरुवातीला अक्षय म्हणतो- 'मी यापूर्वी कधीही माझ्या घरात इंटरव्ह्यू शूट केला नाही.' जेव्हा त्याला त्याच्या ब्रँडचे नाव फोर्स नाईन असे का ठेवले? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर तो म्हणाला, "एक मोठी शक्ती आहे, जी संपूर्ण विश्वाला नियंत्रित करते. दुसरी शक्ती मदर नेचर आहे, तर तिसरी शक्ती ही आर्म्ड फोर्स आहे. माझे वडील सशस्त्र दलात होते आणि माझा लकी क्रमांक 9 आहे. माझा वाढदिवसही त्याच दिवशी असतो. म्हणून मी दोन्ही मिळून हे नाव ठेवले आहे." दरम्यान व्हिडिओत अक्षयच्या घराची झलक बघायला मिळत असून त्याचे घर अतिशय सुंदर आहे.
अक्षयने त्याचे वॉर्डरोब कलेक्शन दाखवले
ब्रँडबद्दलची माहिती दिल्यानंतर अक्षयने त्याचे वॉर्डरोब कलेक्शनदेखील दाखवले आणि म्हणाला – मला खूप आरामदायक कपडे घालायला आवडतात. मी दररोज ट्रॅक पँट घालू शकतो. मला असे काहीतरी तयार करायचे आहे ज्यात रंग आणि कम्फर्ट दोन्ही असेल.'
अक्षयने व्हिडिओमध्ये सांगितले की, तरुण डिझायनर्सची एक टीम त्याच्याशी जुळलेली आहे, जी त्यावर काम करत आहे. तरुणाईला आवडतील अशाच कपड्यांच्या डिझाइन अक्षयला बनवायच्या आहेत. भारतातच या फॅशन ब्रँडचे काम होणार असल्याचे अक्षयने सांगितले.
या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमुळे अक्षय वादात सापडला होता
अक्षय कुमार ‘वेडात मराठे वीर दौड सात’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवतोय. नुकताच चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. व्हिडिओमध्ये खिलाडी कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात दिसत आहे. फर्स्ट लूक समोर आल्यापासून अक्षयला ट्रोल केले जात आहे. ज्या दृश्यात अक्षय छत्रपतींच्या रुपात एंट्री घेताना दिसतो, त्या फ्रेममध्ये एक झुंबर दिसत आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक बल्ब बसवलेले आहे. बल्बचा शोध छत्रपती शिवरायांच्या कार्यकाळानंतर लागला. अशा परिस्थितीत इतिहासाशी छेडछाड का केली जात आहे, असे नेटक-यांचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.