आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेलर आऊट:'धूम धडाका रंग पटाखा आओ बना लो टोली, ला रहे हैं होली पे गोली', अक्षय कुमार स्टारर 'बच्चन पांडे'चा ट्रेलर रिलीज

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बच्चन पांडे' हा तामिळ चित्रपट 'जिगारठंडा'चा रिमेक असल्याचे सांगितले जात आहे.

अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'बच्चन पांडे' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. स्वतः अक्षय कुमारने या अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस आणि क्रिती सेनन यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला ट्रेलर
अक्षय कुमारने चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत लिहिले, 'धूम धड़ाका रंग पटाखा आओ बना लो टोली… इस बार बच्चन पांडे ला रहे हैं होली पे गोली !! 'बच्चन पांडे'चा ट्रेलर रिलीज झाला आहे." या चित्रपटात अक्षय एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसत आहे. 3 मिनिट 42 सेकंदाचा हा ट्रेलर कॉमेडी आणि अ‍ॅक्शनने परिपूर्ण आहे. यामध्ये अक्षयचा भयावह लूकही लक्ष वेधून घेतोय. ट्रेलर रिलीज होताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनाही तो खूप आवडला आहे.

ट्रेलरमध्ये क्रिती सेनन एका दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्यासोबत तिच्या मित्राच्या भूमिकेत अर्शद वारसी आहे. क्रितीला तिचा नवा चित्रपट गँगस्टर बच्चन पांडेवर बनवायचा आहे. पण त्यात खूप धोकाही असतो. ट्रेलरमध्ये प्रतीक बब्बर, संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी यांसारखे स्टार्सही कॉमेडी करताना दिसतात. दुसरीकडे, जॅकलिन फर्नांडिस या चित्रपटात बच्चन पांडेची मैत्रीण 'सोफी'ची भूमिका साकारत आहे.

'बच्चन पांडे' 18 मार्चला रिलीज होणार आहे
या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. या चित्रपटात अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'बच्चन पांडे' 18 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'बच्चन पांडे' हा तामिळ चित्रपट 'जिगारठंडा'चा रिमेक असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाशिवाय अक्षयकडे 'रक्षा बंधन', 'पृथ्वीराज', 'गोरखा', 'बडे मियाँ छोटे मियाँ', आणि 'राम सेतू' हे चित्रपट आहेत.

बातम्या आणखी आहेत...