आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यानंतर आता ज्येष्ठ गायक बप्पी लहरी यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. मंगळवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. 'याद आ रहा है', 'डिस्को डान्सर' आणि 'जिमी जिमी जिमी आजा' अशी अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी बॉलिवूडला दिली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अक्षय कुमार, अजय देवगण, विद्या बालन, चिरंजीवी, विशाल ददलानी, मनोज मुंतशिर, कैलाश खेर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून बप्पी दादांना श्रद्धांजली वाहत आहेत.
आज आपण म्युझिक इंडस्ट्रीतील आणखी एक रत्न गमावले आहे: अक्षय कुमार
अक्षय कुमारने लिहिले, "आज आपण म्युझिक इंडस्ट्रीतील आणखी एक रत्न गमावले... बप्पी दा, तुमचा आवाज लाखो लोकांना थिरकण्यासाठीचे कारण होता. तुम्ही तुमच्या संगीताद्वारे जो आनंद आणला, त्यासाठी धन्यवाद. कुटुंबाप्रती माझ्या संवेदना. ओम शांती."
बप्पी दा वैयक्तिकरित्या खूप प्रिय होते: अजय देवगण
अजय देवगणने लिहिले, "बप्पी दा वैयक्तिकरित्या खूप गोड होते, पण त्यांच्या संगीताला एक धार होती. चलते चलते, सुरक्षा आणि डिस्को डान्सरच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटाला समकालीन शैलीत आणले. शांती दादा, तुमची कायम आठवण येईल."
आणखी एक तारा निखळला - हंसल मेहता
हंसल मेहता यांनी ट्वीट करत बप्पी लहरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘आणखी एक तारा निखळला. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती,’ असे ते म्हणाले.
हळूहळू मोठे मोठे परमात्मात विलीन होत आहेत: कैलास खेर
गायक कैलाश खेर यांनी एक व्हिडिओ शेअर करून लिहिले, "हळूहळू मोठे आत्मे परमात्मात विलीन होत आहेत. फक्त प्रार्थना. आज बप्पी दा वैकुंठलोकात गेले आहेत. त्यांचा आत्म्याला शांती लाभो. हरी ओम."
या सेलिब्रिटींनीही बप्पी दा यांना वाहिली श्रद्धांजली -
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.