आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूट स्टार्ट:अक्षयने साराबरोबर 'अतरंगी रे' चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरुवात, सेटवरून पहिला फोटो केला शेअर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'अतरंगी रे' चित्रपटाचे शूटिंग मार्च 2020 मध्ये सुरू झाले होते.

अभिनेता अक्षय कुमारने आज (शुक्रवार) पासून त्याच्या आगामी 'अतरंगी रे' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अक्षयने स्वत: आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सारा अली खानदेखील दिसतेय. फोटोत हे दोघेही एकमेकांकडे बघून हसताना दिसत आहेत.

फोटो शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले, 'लाइट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन, हे तीन शब्द ऐकून मला आनंद होतो. याची सर दुस-या कशालाही नाही. आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. तुमचे प्रेम आणि शुभेच्छा सोबत असू द्या.'

सारा अली खान हिनेदेखील तोच फोटो शेअर करत लिहिले आहे, 'अतरंगी रेचे शूटिंग आता अधिक रंगतदार होणार आहे. अक्षय चित्रपटाच्या सेटवर आला आहे. मी खूप उत्साही आणि आभारी आहे, कारण मला अक्षयबरोबर काम करण्याची संधी मिळत आहे.' सारा आणि अक्षयचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोरोनामुळे एका मोठ्या ब्रेकनंतर अक्षय पुन्हा शुटिंग सेटवर परतला आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयसह सारा अली आणि धनुष मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय झीशान अयूब देखील स्टारकास्टचा एक भाग आहे. या चित्रपटात ए.आर. रहमान संगीत देत आहेत. चित्रपटाची गाणी हिमांशु शर्मा यांनी लिहिली आहेत.

'अतरंगी रे' चित्रपटाचे शूटिंग मार्च 2020 मध्ये सुरू झाले होते. मात्र कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे चित्रपटाचे शूटिंगमध्ये अर्ध्यावर बंद पडले होते. यानंतर चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबरमध्ये पुन्हा सुरू झाले. चित्रपटाच्या दुसर्‍या शेड्युलमध्ये सारा धनुषसोबत शुटिंग करत होती. आता अक्षय चित्रीकरणात सहभागी झाला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser