आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारची आई काळाच्या पडद्याआड:अरुणा भाटिया अनंतात विलीन, मुंबईतील विले पार्ले स्मशान भूमीत झाले अंत्यसंस्कार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अरुणा भाटिया मागील सहा दिवसांपासून रुग्णालयात दाखल होत्या.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे आज सकाळी वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. मागील सहा दिवसापासून त्यांच्यावर मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील विले पार्ले स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अक्षय कुमार
अक्षय कुमार

यावेळी रोहित शेट्टी, रितेश देशमुख, साजिद खान, रमेश तौरानी यांच्यासह अनेक कलाकारांनी अरुणा भाटिया यांचे अंत्यदर्शन घेतले.

रितेश देशमुख आणि साजिद खान
रितेश देशमुख आणि साजिद खान

आईच्या निधनाची बातमी अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून दिली. यात तो म्हणाला, 'ती माझा कणा होती आणि आज मला तिच्या जाण्याने अंतःकरणात असह्य वेदना होत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे आणि ती माझ्या वडिलांकडे दुसऱ्या जगात गेली आहे. या कठीण काळात माझ्या कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांना आदर करतो. ओम शांती.'

बॉलिवूड कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
अक्षय कुमारच्या आईच्या निधनावर चाहत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता अजय देवगणने लिहिले, "अरुणा यांच्या आत्म्याला शांती लाभो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी संवेदना. ओम शांती." दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी लिहिले, "तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला माझ्या मनापासून संवेदना. ओम शांती."

अक्षयच्या 'एअरलिफ्ट' चित्रपटातील त्याची सह-कलाकार निमरत कौरने हिनेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अरुणा भाटिया यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

छायाचित्रांमध्ये बघा आईसोबतचे अक्षयचे नाते

अक्षयने आपल्या आईच्या नावावर 25 कोटी दान दिले होते.
अक्षयने आपल्या आईच्या नावावर 25 कोटी दान दिले होते.
अक्षय त्याच्या आईच्या खूप जवळ होता. त्याला आईसोबत वेळ घालवायला आवडायचे. आपल्या आईच्या निधनाने अभिनेत्याला मोठा धक्का बसला आहे.
अक्षय त्याच्या आईच्या खूप जवळ होता. त्याला आईसोबत वेळ घालवायला आवडायचे. आपल्या आईच्या निधनाने अभिनेत्याला मोठा धक्का बसला आहे.
2018 मध्ये मदर्स डेच्या निमित्ताने अक्षयने आई आणि बहिणीसोबतचा हा फोटो शेअर केला होता.
2018 मध्ये मदर्स डेच्या निमित्ताने अक्षयने आई आणि बहिणीसोबतचा हा फोटो शेअर केला होता.

मुलाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी घेतला जगाचा कायमचा निरोप

मुलाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारचा वाढदिवस 9 सप्टेंबरला असतो. अक्षय त्याच्या आईच्या खूप जवळ होता. त्यांची प्रकृती ठिक नसल्याची बातमी मिळाल्यानंतर तो तातडीने चित्रीकरण अर्धवट सोडून सोमवारी मुंबईला परतला होता. अक्षय लंडनमध्ये त्याच्या आगामी 'सिंड्रेला' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेला होता.

बातम्या आणखी आहेत...