आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:माजी हॉकीपटू बलबीर सिंग यांच्या निधनाबद्दल अक्षयने व्यक्त केला शोक, फोटो शेअर करुन लिहिले - अद्भूत व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती होती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास बलबीर सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 95 वर्षांचे होते.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने माजी हॉकीपटू बलबीर सिंग दोसांझ उर्फ ​​बलबीर सिंग सीनियर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याने ट्विटरवर त्यांच्यासोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर करुन त्यांचे अद्भूत व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती म्हणून वर्णन केले आहे. अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "हॉकीचे दिग्गज बलबीर सिंगजी यांचे निधन झाल्याचे ऐकून वाईट वाटले. काही काळापूर्वी मला त्यांना  भेटण्याचे भाग्य लाभले होते. इतके अद्भूत व्यक्तिमत्व! त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मनःपूर्वक संवेदना."

बलबीर आठवडाभर कोमात होतो

95 वर्षीय बलबीर यांना 8 मे रोजी न्यूमोनिया आणि तापामुळे मोहालीस्थित फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना तीनदा हृदयविकाराचा झटका आला. यानंतर, मेंदूमध्ये रक्ताचा थर जमा झाला आणि 18 मे रोजी तो कोमामध्ये गेला. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेलसिंकी ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात 5 गोल केले

1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये नेदरलँड्सविरुद्ध बलबीर सिंग यांनी 5 गोल केले होते. ऑलिम्पिक फायनलमध्ये सर्वाधिक गोल नोंदवण्याचा त्यांचा विक्रम अजूनही कायम आहे. भारताने हा सामना 6-1 ने जिंकला होता.

तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले

लंडन (1948), हेलसिंकी (1952) आणि मेलबर्न (1956)  ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणा-या भारतीय संघातील बलबीर सदस्य होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील 16 महान खेळाडूंमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला होता. या यादीत समाविष्ट होणारे ते देशातील एकमेव खेळाडू होते. या व्यतिरिक्त ते पद्मश्री (1957) पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले खेळाडूही होते. 1975 मध्ये एकमेव हॉकी विश्वचषक जिंकणा-या भारतीय संघाचे ते मॅनेजर होते.  

बातम्या आणखी आहेत...