आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधन VS लाल सिंग चड्ढा:बॉक्स ऑफिसवर होणार आमिर-अक्षयच्या चित्रपटाची टक्कर, खिलाडी म्हणाला – हा संघर्ष नव्हे एक मोठा दिवस

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे

अक्षय कुमार स्टारर 'रक्षाबंधन' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यासोबतच चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे, हा चित्रपट 11 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी रिलीज होणार आहे. याच दिवशी आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपटही रिलीज होत आहे. विशेष म्हणजे या दिवशी या दोन मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे, त्यामुळे हा या वर्षातील बॉलिवूडमधील सर्वात मोठा संघर्ष असल्याचे म्हटले जात आहे. याचा परिणाम नक्कीच बाॅक्स ऑफिसवर होण्याची शक्यता आहे. ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये अक्षयने मीडियाशी या क्लॅशबद्दल चर्चा केली. तो म्हणाला की, हा बॉक्स ऑफिसवरील संघर्ष नव्हे तर मोठा दिवस असेल.

दोन्ही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे
आमिरच्या चित्रपटासोबत क्लॅश होत असल्याच्या प्रश्नावर अक्षय कुमार म्हणाला, हा संघर्ष नाही. फक्त दोन चांगले चित्रपट एकत्र येत आहेत. हा खूप मोठा दिवस असेल. कोविडमुळे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत, तर काही चित्रपट अजूनही रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. आता एकाच वेळी अधिकाधिक चित्रपट प्रदर्शित होतील हे अगदी स्वाभाविक आहे. दोन्ही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा अक्षयने व्यक्त केली आहे.

रक्षाबंधनचे दिग्दर्शक काय म्हणाले?

आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'ची घोषणा आधीच झाली होती. मग 'रक्षाबंधन'च्या प्रदर्शनाची तारीख का बदलली नाही? यावर आनंद एल राय म्हणाले, 'हा मोठा विकेण्ड आहे. लागून सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे दोन चित्रपट आरामात रिलीज होऊ शकतात. तीन होणार असते, तर मग आम्ही आमची तारीख बदलली असती. पण दोन चित्रपट चांगले प्रेक्षक खेचू शकतात. लोकांनाही समोर पर्याय मिळतील,' असे ते म्हणाले.

'लाल सिंग चड्ढा' हा फॉरेस्ट गंपचा आहे रिमेक आमिर खान आणि करीना कपूर स्टारर 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत रिमेक आहे. यात टॉम हँक्स मुख्य भूमिकेत होता. तर लाल सिंग चड्ढामध्ये आमिरने टॉम हँक्सने साकारलेली भूमिका वठवली आहे. चित्रपटात आमिर आणि करीनासह नागा चैतन्यही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'रक्षाबंधन' बहीणभावाची कथा
'रक्षाबंधना'ची कथा एका भावाची आहे जो आपल्या चार बहिणींच्या लग्नाची जबाबदारी उचलतो. ही भावाची भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे. दरम्यान, त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली भूमी पेडणेकर त्याच्याकडे लग्नासाठी हट्ट धरते. चित्रपटात नात्याची घट्ट वीण दिसते. यामध्ये अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर, सादिया खतीब, सीमा पाहवा, दीपिका खन्ना प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे.