आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रक्षाबंधन’:चित्रपटात हुंड्यासह अनेक सामाजिक मुद्दे दिसणार, याच निर्मात्यांसोबत लवकरच ‘गोरखा’चे चित्रीकरण सुरू करणार

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षयसोबत तिच टीम पुढेही काम करणार

येत्या ऑगस्टमध्ये दोन मोठे चित्रपट येत आहेत. 'लाल सिंग चड्ढा' आणि 'रक्षाबंधन'. बहुतांश चित्रपटात सडपातळ दिसणाऱ्या अक्षय कुमारचे वजन दीर्घ काळानंतर ‘रक्षाबंधन’मध्ये वाढलेले दिसणार आहे. ‘अतरंगी रे’ची कथा लिहिणाऱ्या हिमांशु शर्मा यांनी कनिका ढिल्लनसमवेत ही कथा लिहिली आहे. कनिका ही हिमांशु यांची पत्नीही आहे. दोघांनी अक्षयचे पात्र आणि चित्रपटाशी निगडीत माहिती दिली. हिमांशु आणि कनिकाने खास चर्चेत सांगितले की, ‘या चित्रपटात अक्षयची भूमिका दिल्लीच्या चाँदनी चौकाशी निगडीत आहे. त्याचे नाव आहे केदारनाथ अग्रवाल. चाँदनी चौकात केदारनाथचा पाणीपुरीचा स्टॉल आहे. अक्षयने या पात्रासाठी वजन वाढवले आहे. कारण पाणीपुरी विकणारी व्यक्ती बहुतांश वेळी त्याच धाटणीची असते. चाँदनी चौकात या व्यवसायातील लोक पातळ मिशी ठेवतात. त्यामुळे अक्षयनेही आपले व्यक्तीमत्त्व तसेच ठेवले आहे.’

हुंड्यासह अनेक सामाजिक मुद्दे चित्रपटात दिसणार
दोघे पुढे सांगतात की,..‘चित्रपटात हुंड्यासह समाजाशी निगडीत अनेक मुद्दे आहेत. हुंडा हा केवळ कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाची समस्या असल्याचे आपण म्हणू शकत नाही. उच्चभ्रू कुटुंबात हुंड्याचा चेहरा बदलतो. तेथे पैशाऐवजी महागड्या भेटवस्तू येतात. मात्र समस्या तर कायमच असते. अनेकदा भांडी मोजताना मुलाच्या घरी एखादे कमी निघाले तर तो मोठा मुद्दा बनतो. यासारख्या अनेक गोष्टी आम्ही दाखवल्या आहेत.’

अक्षयसोबत तिच टीम पुढेही काम करणार
हिमांशु सांगतात...‘आम्ही अक्षयसोबत पुढे ‘गोरखा’ही करणार आहोत. चित्रिकरण पुढील वर्षीच्या मध्यात सुरू होईल. हा एक युद्धपट आहे. त्यामुळे कथेच्या स्पष्टतेसाठी अनेक मंत्रालयांची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रिकरण यावर्षी शेवटी किंवा पुढील वर्षीच्या मध्यात सुरू होऊ शकते.’

चित्रपटात नव्या कलाकारांना संधी
‘रक्षाबंधन’मध्ये अक्षयच्या चारही बहिणींच्या रुपात नव्या कलाकारांना संधी देण्यात आली आहे. सादिया खतीबने विधू विनोद चोप्रांच्या ‘शिकारा’तून सुरुवात केली होती. इतर बहिणींच्या भूमिकेत शाहजमीन कौर, दीपिका खन्ना आणि स्मृती श्रीकांत आहेत. त्या कलाकारांबाबत कनिका आणि हिमांशु सांगतात, "आम्ही या चार बहिणींच्या रुपात वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करणाऱ्या तरुणींचा प्रवास मांडला आहे. या चित्रपटाद्वारे आम्ही छोट्या शहरात प्रवेश केला आहे. तेथील पूर्ण गल्ली हे आपले जणू घरच वाटते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या शेजारी कुटुंबाची काळजी आहे. ते लग्नसोहळा वा इतर कार्यक्रमांत मदतीला नेहमीच तयार असतात."