आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रामसेतू’:आतापर्यंत झाले फक्त 5 दिवसांचे शूटिंग, 15 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार काम

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'रक्षाबंधन' चित्रपटानंतर ब्रेक न घेता शूट पूर्ण करणार अक्षय कुमार...

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेतही अक्षय कुमार कुठेच तडजोड करताना दिसत नाहीये. जूनमध्ये त्याने ‘पृथ्वीराज’चे शूटिंग पूर्ण केले आणि आता तो ‘रक्षाबंधन’ वर काम करत आहे. याचे शूटिंगदेखील तो जुलै-ऑगस्टपर्यंत पूर्ण करून टाकणार आहे. त्यानंतर कामातून ब्रेक न घेता तो ‘राम सेतु’चे शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या एबंडशिया एंटरटेनमेंटचे प्रमुख विक्रम मल्होत्राने सांगितले, निर्माते सप्टेंबरमध्ये याच्या शूटिंगचा विचार करत आहेत, तोपर्यंत अक्षयचा ‘रक्षाबंधन’ पूर्ण होईल. शिवाय तोपर्यंत मुंबईत पावसाळा राहणार नाही. शिवाय रामसेतू बनवण्याचा उद्देश कोणत्याही राजकीय पार्टीला फायदा पाेहोचवण्याचेही निर्मात्यांनी स्पष्ट केले. इतर चित्रपट जसे बनवले जातात त्याच उद्देश्याने हा चित्रपटही बनवला जात आहे.

2022च्या दिवाळीला होणार प्रदर्शित
जेथे आधी शूट करण्याचा विचार होता, तेथे आता निर्माते नव्या शेड्यूलमध्ये शूट करणार नाहीत. त्याऐवजी निर्माते नवे दृश्य शूट करतील. याचे शूटिंग शक्यतो 15 सप्टेंबरनंतर सुरू होणार आहे. कारण ऑगस्टमध्ये मुंबईत भरपूर पाऊस पडतो. निर्माते चित्रपटात आऊटडोअर लोकेशनवर अॅक्शन आणि अॅडव्हेंचर दृश्य चित्रित करणार आहेत. चित्रपटासाठी क्रू सदस्यांची संख्याही मोठी राहणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीला प्रदर्शित केला जाणार आहे. शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शन आदींसाठी निर्माते बराच वेळ स्टॉकमध्ये ठेवून चालतील.

दोन शेड्यूल मिळून बनले एक शेड्यूल
दिव्य मराठीशी खास बातचीतमध्ये विक्रम मल्होत्राने सांगितले, यावर्षी आम्ही फक्त पाच दिवस 'रामसेतू’चे शूटिंग करु शकलो. त्यानंतर अक्षय पॉझिटिव्ह आला होता. नंतर लाॅकडाऊन लागले होते. आता आम्ही यावर पुन्हा काम सुरू करणार आहोत. चित्रपटात थोडा बदल करण्यात आला आहे. आता आम्ही ‘रामसेतू’चा एक मोठा प्लॅन करत आहोत. अाधीच्या प्लॅननुसार, आम्ही मुंबईत छोटा शेड्यूल शूट करणार होतो. नंतर एक ब्रेक घेणार होतो. मात्र आता आम्ही दोन शेड्यूल ठेवले आहेत. दोन्ही एकत्र शूट करणार आहोत. कारण हा चित्रपट अक्षयच्या पात्रावर आधारित आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थिती एकही दृश्य चित्रीत केले जाणार नाही.

‘बेल बॉटम’ला मिळाली 30 कोटींची ऑफर

याव्यतिरिक्त अक्षयचा स्पाय थ्रिलर ‘बेल बॉटम’ रिलीजसाठी तयार आहेत. तो 27 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर तो प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर चित्रपट लवकर प्रदर्शित करण्यासाठी प्राइम व्हिडिओने ‘बेल बॉटम’च्या निर्मात्यांना जास्त मानधन देण्याची ऑफर दिल्याचे ऐकले आहे. जर ‘बेल बॉटम’ थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 3 आठवड्याच्या आत ओटीटीवर झळकला तर प्राइम व्हिडिओ यासाठी निर्मात्याला अतिरिक्त 30 कोटी रुपये देईल. खरं तर, आता कोणताही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्याच्या 6 ते 8 आठवड्याच्या आत ओटीटीवर रिलीज होत असतो.

बातम्या आणखी आहेत...