आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा खिलाडी अर्थातच अभिनेता अक्षय कुमार कोविड -19 विरुद्धची लढाई जिंकून घरी परतला आहे. ही माहिती त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ट्विंकलने एक व्यंगचित्र शेअर केले आहे, ज्यात अक्षय आणि ती दिसतेय. कॅप्शनमध्ये ट्विंकलने लिहिले आहे, "सुखरुप. त्याला माझ्या जवळ बघून आनंद झाला आहे. सर्वकाही ठीक आहे," अशा आशयाची पोस्ट ट्विंकलने शेअर केली आहे.
4 एप्रिलला पॉझिटिव्ह आली होती अक्षयची चाचणी
अक्षय कुमारचा कोरोना रिपोर्ट 4 एप्रिलला पॉझिटिव्ह आला होता. सोशल मीडियावर ही माहिती देताना 53 वर्षीय सुपरस्टारने लिहिले होते की, "आज सकाळी माझी कोविड -19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सर्व प्रोटोकॉल फॉलो करत आहे. मी त्वरित स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी होम क्वारंटाइन आहे. आणि आवश्यक वैद्यकीय मदत घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लवकरात लवकर चाचण्या करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी. मी लवकरच परत येईल," असे अक्षय म्हणाला होता.
अक्षयला 5 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
अक्षय कुमारला संसर्ग झाल्याच्या दुसर्या दिवशी म्हणजे 5 एप्रिल रोजी पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याच्या आगामी 'रामसेतु' चित्रपटाच्या सेटवर 45 क्रू मेंबर्सना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आले होते. या चित्रपटाची सहनिर्मिती करणारी कंपनी अबंदंतिया एंटरटेनमेंटचे मालक विक्रम मल्होत्रा यांनी या वृत्ताला अफवा म्हटले होते. ते म्हणाले होते की, 25 लोकांना संसर्ग झाला आहे, परंतु यापैकी कुणीही टीमचा भाग नाही.
मल्होत्रा म्हणाले होते की, 5 एप्रिल रोजी मड आयलँडवर शूटिंग सुरू होणार होती, त्यासाठी 190 लोकांची टीम तयार करण्यात आली होती. जेव्हा दोन दिवसांपूर्वी सर्वांची चाचणी घेण्यात आली तेव्हा 25 लोकांचा अहवाल सकारात्मक आला आणि त्यांना युनिटमधून काढून टाकण्यात आले. सेटवर असलेल्या 25 पॉझिटिव्ह लोकांमुळे अक्षय कुमारला संसर्ग झालेला नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.