आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अक्षयच्या फिटनेस रहस्य:हुमा कुरेशीच्या प्रश्नावर अक्षय कुमारचा खुलासा, म्हणाला  - मी रोज सकाळी गोमूत्र प्राशन करतो, त्यामागे आयुर्वेद आहे

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'इन टू द वाइल्ड विथ बिअर ग्रिल्स'चा हा अक्षय कुमार स्पेशल एपिसोड 11 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे.

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार हा त्याचा आगामी 'बेलबॉटम' या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने सध्या स्कॉटलंडमध्ये आहे. दरम्यान अक्षयने को-स्टार हुमा कुरेशीसह मिळून बेअर ग्रील्ससोबत एक धमाकेदार इंस्टाग्रामम सेशन केले. यात अक्षयने बेअरसोबत कर्नाटकच्या बांदिपूर नॅशनल पार्कमध्ये केलेल्या 'द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स'च्या स्पेशल एपिसोडविषयीचे अनुभव शेअर केले.

या सेशनमध्ये बेअरने हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेल्या चहाचा स्वाद कसा होता, असा प्रश्न हुमाने अक्षयला विचारला. तेव्हा बेअरसुध्दा म्हणाला की, खरंच हे तुझ्यासाठी आव्हानात्मक होतं का? त्यावर अक्षय हसून म्हणाला, काही आयुर्वेदिक कारणास्तव मी दररोज गोमूत्र प्राशन करतो, त्या मानाने हा चहा ठिकच होता.

  • रणवीरने केली मिशीवर कमेंट

डिस्कव्हरी चॅनेलचा हा जगप्रसिध्द शो 'इन टू द वाइल्ड विथ बिअर ग्रिल्स'चा हा अक्षय कुमार स्पेशल एपिसोड 11 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. जवळजवळ 27 मिनिटांच्या इंस्टाग्राम लाइव सेशनमध्ये अक्षय आणि बिअर यांनी शूटिंगशी निगडीत आपले अनुभव शेअर केले. दरम्यान रणवीर सिंहने अक्षयच्या मिशीवर कमेंट केले. त्यावर अक्षयने सांगितले की, त्याचा हा लूक त्याच्या कुटुंबाला आवडत नाही.

0