आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कोरोनाच्या विळख्यात:अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होता येणार नाही

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारला कोरोना झाला आहे. त्याने स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. यामुळे आता तो कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. खरं तर, यावर्षी कान्स चित्रपट महोत्सवात भारताला सन्मानित देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे अक्षय कुमार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह भारतीय शिष्टमंडळ म्हणून महोत्सवाला उपस्थित राहणार होता. अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी त्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही संसर्ग झाला होता.

ट्विट करून दिली माहिती

कान्स 2022 च्या इंडिया पॅव्हेलियनमध्ये आमच्या सिनेमासाठी मी खूप उत्सुक होतो, परंतु दुर्दैवाने माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. त्यामुळे आता मी विश्रांती घेईन. अनुराग ठाकूर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा, असे ट्विट अक्षय कुमार यांनी केले आहे.

होम क्वारंटाईन राहावे लागेल

BMC अधिकाऱ्याने ETimes ला सांगितले की, आमच्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या यादीत अक्षयचे नाव समाविष्ट नाही. कदाचित त्याची चाचणी घरीच झाली असेल. त्यांना 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल.

अक्षयचा वर्कफ्रंट

अक्षय कुमारचा पृथ्वीराज हा मोस्ट अवेटेड चित्रपट 3 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. याशिवाय त्याने नुकतेच सेल्फी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यात त्याने राधिका मदनसोबत आगामी अनटायटल चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. अक्षयचा रक्षाबंधन हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तर राम सेतू हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट महोत्सवात भारत 'कंट्री ऑफ ऑनर' असेल

या वर्षी होणाऱ्या कान्स महोत्सवात अलीकडेच भारताची अधिकृत 'कंट्री ऑफ ऑनर' म्हणून निवड करण्यात आली. कान्स फिल्म मार्केटमध्ये 'कंट्री ऑफ ऑनर'ची परंपरा पहिल्यांदाच सुरू होत आहे. माहिती शेअर करताना अनुराग सिंह ठाकूर यांनी लिहिले की, 'कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताची अधिकृतपणे सन्मानित देश म्हणून निवड झाली आहे. आम्हाला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक संदेश द्यायचा आहे की 'इंडिया द कंटेंट हब ऑफ द वर्ल्ड', आम्ही भारताला या दिशेने मांडू.

बातम्या आणखी आहेत...