आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्षय कुमारच्या आयुष्यात कधीही न भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली. बुधवारी त्याची आई अरुणा भाटिया यांचे निधन झाले. त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्याच्या आईने या जगाचा कायमचा निरोप घेतला. रिपोर्ट्सनुसार, अक्षय शुक्रवारी यूकेला परतणार आहे. तिथे तो निर्माता वाशु भगनानीसोबत त्यांच्या नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. अक्षय नेहमीच इंडस्ट्रीमधील सर्वात मेहनती कलाकारांपैकी एक आहे आणि आता तो वाशू यांच्या अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार आहे.
8 सप्टेंबर रोजी झाले आईचे निधन
आईच्या निधनाची बातमी अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून दिली होती. यात तो म्हणाला होता, 'ती माझा कणा होती आणि आज मला तिच्या जाण्याने अंतःकरणात असह्य वेदना होत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे आणि ती माझ्या वडिलांकडे दुसऱ्या जगात गेली आहे. या कठीण काळात माझ्या कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांना आदर करतो. ओम शांती.'
आनंद एल राय यांच्या दु: खात झाला होता सामील
आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अक्षय दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या आईच्या अंत्यसंस्कारातही सामील झाला होता. 8 सप्टेंबर रोजी आनंद यांच्या आईचेही निधन झाले होते. आनंद यांच्या आईवर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अक्षय आणि आनंद दोन प्रोजेक्टवर एकत्र काम करत आहेत. अक्षयने या वर्षाच्या सुरुवातीला सारा अली खान आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' चे शूटिंग पूर्ण केले आणि 'रक्षाबंधन'चे शूटिंग सुरू होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.