आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्स्ट लुक:अक्षय कुमारच्या 'गोरखा' चित्रपटाचे पोस्टर रिलीज, मेजर जनरल इयान कार्डोजोंच्या भूमिकेत दिसला खिलाडी कुमार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दस-याच्या मुहूर्तावर अक्षयने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

'अतरंगी रे' आणि 'रक्षाबंधन' या चित्रपटांनंतर अभिनेता अक्षय कुमार आणि आनंद एल राय यांच्या तिसऱ्या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट भारतीय लष्कराच्या पाचव्या गोरखा रेजिमेंट गोरखा रायफल्सचे महान अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोजो यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरन सिंह चौहान करणार आहेत. इयान कॉर्डोजो यांच्याबद्दल सांगायचे म्हणजे, त्यांनी 1962, 1965 च्या युद्धांमध्ये आणि विशेषतः 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात लढा दिला होता.

अक्षयने शेअर केले पोस्टर
दसऱ्याच्या मुहूर्तावर फर्स्ट लूक पोस्टर शेअर करताना अक्षयने लिहिले, "कधीकधी आपल्यासमोर अशा कथा येतात ज्या इतक्या प्रेरणादायी असतात की तुम्हाला त्या तयार करायच्या असतात. गोरखा - महान योद्धे जनरल इयान कार्डोजो यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट आहे. आयकॉनची भूमिका साकारताना आणि हा विशेष चित्रपट सादर करताना सन्मान वाटतो.'

इयान कार्डोजो कोण आहेत?
इयान कार्डोजो हे पाचव्या गुरखा रायफल्सचे मेजर जनरल होते. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात इयान कार्डोजो यांनी आपले अदम्य धैर्य आणि शौर्य दाखवले. युद्धादरम्यान अशी परिस्थिती होती जेव्हा त्यांना स्वतःचा पाय कापावा लागला. युद्धादरम्यान एका ऑपरेशनमध्ये, इयान कार्डोजो यांचा पाय लँडमाइनवर पडला आणि लँडमाइनवर आदळताच स्फोट झाला. जेव्हा इयान कार्डोजोंना कळले की स्फोटानंतर त्याचा पाय खूपच जखमी झाला आहे, तेव्हा त्यांनी स्वतःचा पाय कापला होता.

बातम्या आणखी आहेत...