आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टारकिडची एंट्री:अक्षय कुमारने रिलीज केले सुनील शेट्टीचा मुलगा अहानच्या डेब्यू चित्रपटाचे पोस्टर, म्हणाला - 'तुझ्या वडिलांच्या 'बलवान' चित्रपटाचे पोस्टरही आजही आठवते'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाचे पहिले पोस्टर अभिनेता अक्षय कुमारने रिलीज केले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. अहानचा पदार्पणातील चित्रपट 'तडप'ची झलक देखील समोर आली आहे, या चित्रपटाचे पहिले पोस्टर अभिनेता अक्षय कुमारने रिलीज केले आहे.

अक्षयने व्यक्त केला आनंद

चित्रपटाचे पोस्टर रिलीज करताना अक्षयने सोशल मीडियावर लिहिले, 'अहान तुझ्यासाठी हा मोठा दिवस आहे. मला अजूनही तुझे वडील सुनील शेट्टी यांच्या 'बलवान' चित्रपटाचे पोस्टर आठवते आणि मी आज तुझ्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करत आहे. मी खूप आनंदी आहे. सादर करतोय साजिद नाडियाडवालांचा 'तडप' हा चित्रपट, ज्यामध्ये अहान शेट्टी आणि तारा सुतारिया दिसणार आहेत. हा चित्रपट 24 सप्टेंबर 2021 रोजी प्रदर्शित होईल,' असे अक्षयने लिहिले आहे.

चित्रपटाचे दोन पोस्टर्स आले समोर

चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत, ज्यात एका पोस्टरवर अहान सिगारेट पीत असल्याचे दिसून आले आहे. दुसर्‍या पोस्टरमध्ये तो तारा सुतारियासोबत दिसला आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. अहानच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी 2017 मध्ये सुनील शेट्टी म्हणाले होते की, 'अहानचे पदार्पण सुरक्षित हातात आहे. तो अजूनही लंडनमध्ये अभिनय शिकत आहे आणि त्यानंतर साजिद नाडियाडवाला त्याला लाँच करणार आहेत.'

A post shared by Ahan Shetty (@ahan.shetty)

अहानपूर्वी सुनील शेट्टींची मुलगी अथिया शेट्टीने 2015 मध्ये 'हीरो' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिला सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसने लाँच केले होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर अथिया 'मोतीचूर चकनाचूर', 'मुबारकां' सारख्या चित्रपटात झळकली.

बातम्या आणखी आहेत...