आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातोय. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच्या करिअरला उतरती कळा लागली असून त्याचे एकामागोमाग एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉपच्या यादीत जमा होत आहेत. दरम्यान अक्षय द एंटरटेनर्स या आपल्या वर्ल्ड टूरमध्ये चर्चेत आहे. अलीकडेच त्याने वर्ल्ड टूरदरम्यान अमेरिकेत सोनम बाजवा आणि मौनी रॉय यांच्यासोबत शर्टलेस होत डान्स केलाय या डान्समुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होतोय अक्षयचा व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अक्षय कुमार स्टेजवर मौनी रॉय आणि सोनम बाजवा यांच्यासोबत शर्टलेस होऊन डान्स करताना दिसतोय. व्हिडिओत अक्षयने 2012 मध्ये आलेल्या 'खिलाडी 786' या चित्रपटातील 'बलमा' या गाण्यावर ठुमके लावले. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असून एकीकडे काहीजण त्याचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे अनेकांनी त्याला ट्रोलदेखील केले आहे.
सोशल मीडियावर उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया
अक्षयच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. काही नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत, तर काहींनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. काही लोकांनी अक्षयच्या फिटनेसचे कौतुक केले. 'अक्षय वयाच्या 59 व्या वर्षीही अगदी फिट दिसतोय,' असे काहींनी म्हटले आहे. तर एका यूजरने अक्षयचे कौतुक करताना लिहिले, 'तू अजूनही अॅथलीटसारखा दिसतोस.'
नेटकऱ्यांनी अक्षयवर साधला निशाणा
दुसरीकडे अक्षयच्या शर्टलेस परफॉर्मन्सवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. एका यूजरने लिहिले, 'या वयात शर्टलेस होऊन तरुण मुलींसोबत डान्स करणे तुला शोभत नाही.' तर आणखी एकाने लिहिले, 'वयाच्या 59 व्या वर्षी शर्टलेस अंकलला 23-24 वर्षांच्या मुलांसोबत डान्स करताना पाहणे खूप विचित्र वाटते.' तर एकाने लिहिले, 'हा अक्षयच्या करिअरचा डाऊनफॉल आहे.' आणखी एकजण अक्षयला ट्रोल करत म्हणाला की, 'अंकल थोडी तर लाज बाळग.' ही 'भारतीय संस्कृती नव्हे तर कॅनडियन कल्चर आहे,' असे म्हणत एकाने अक्षयवर निशाणा साधला.
अक्षय कुमारचे चित्रपट
अक्षय कुमार शेवटचा 'सेल्फी' या चित्रपटात इमरान हाश्मी, नुसरत भरुचा आणि डायना पेंटी यांच्यासोबत दिसला होता. राज मेहता दिग्दर्शित हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ड्रायव्हिंग लायसन्स' या मल्याळम चित्रपटाटा अधिकृत रिमेक होता. अक्षय कुमार लवकरच 'बडे मियाँ, छोटे मियाँ'मध्ये दिसणार आहे. याशिवाय 'OMG 2' मध्ये तो पंकज त्रिपाठी आणि यामी गौतमसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या अक्षय 'हेरा फेरी 3'च्या चित्रीकरणात बिझी आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.