आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनजागृतीसाठी शूटिंग:अक्षय कुमारने आर. बाल्कींसोबत लॉकडाऊनमध्ये शूट केली शॉर्ट फिल्म, हे आहे यामागचे कारण   

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षय कुमार, आर बाल्की यांच्यासह संपूर्ण टीम मास्क घालून होती. लोकेशनवर फक्त 20 लोक उपस्थित होते.

अभिनेता अक्षय कुमारने दिग्दर्शक आर. बाल्की यांच्यासह मुंबईतील कमालिस्तान स्टुडिओमध्ये एका शॉर्ट फिल्मची शूटिंग केली. 22 आणि 23 मे रोजी चित्रीत झालेल्या या शॉर्ट फिल्ममध्ये अक्षयची प्रमुख भूमिका आहे. शूटिंग करताना सर्व नियमांचे पालन केले गेले. संपूर्ण सेटचे सॅनिटायझिंग, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यासारख्या सर्व सुरक्षा उपायांची यावेळी काळजी घेतली गेली. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.  कोरोनाविषयी जनजागृती करणारी ही शॉर्ट फिल्म आहे. केंद्र सरकारची ही जाहिरात असून लवकरच ती झळकणार आहे. 

याविषयी बाल्की यांनी सांगितले की, ''अक्षय आणि मी भारत सरकारसाठी या जाहिरातीची शूटिंग केली. या लघुपटातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले जाणार आहे. आम्ही आवश्यक ती सर्व काळजी घेऊन याचे चित्रीकरण पूर्ण केले. आमचे निर्माते अनिल नायडू यांनी सर्व गोष्टी उपलब्ध करु दिल्या आणि आम्ही सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले.  केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत चित्रीकरण केले गेले.'' याआधी अक्षय आणि बाल्की यांनी ‘पॅडमॅन’ चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र, अक्षयलाही या शूटसाठी ट्रोल केले जात होते.

सतत टीका होत असल्यामुळे, पीजीआय, FWICE चे अशोक पंडित यांनी  एक व्हिडीओ रिलीज करुन स्पष्ट केले की, सरकारच्या आदेशावरुन चित्रीत करण्यात आलेली ही शॉर्ट फिल्म आहे. जोपर्यंत सरकारकडून आवश्यक मार्गदर्शक सूचना मिळत नाही तोवर इंडस्ट्रीत चित्रीकरणाला सुरुवात केली जाणार नाही. 

बातम्या आणखी आहेत...