आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार अक्षयचा 'सूर्यवंशी', आगामी चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपये घेणार अभिनेता विजय

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी

कोरोनाच्या दुसरी लाट आता हळूहळू ओसरु लागली आहे. त्यामुळे देशात अनलॉक होत आहे. बर्‍याच राज्यांत 50 टक्के प्रेक्षकांची क्षमता असलेले सिनेमा हॉल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून जुलैपर्यंत परिस्थितीत आणखी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत चित्रपटांच्या थिएटर रिलीज तारखेची घोषणाही सुरू झाली आहे. अक्षय कुमार स्टारर 'बेल बॉटम' नंतर रोहित शेट्टी दिग्दर्शित त्याच्या पुढच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या रिलीज डेटची शक्यता वर्तवली जात आहे. गांधी जयंतीच्या दिवशी 'सूर्यवंशी' हा चित्रपट रिलीज करण्याची अक्षय आणि टीम विचार करत आहे. अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. नुकताच अक्षयने 'बेल बॉटम' हा चित्रपट 27 जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले होते.

2. वामसीच्या 'थालापती 66' चित्रपटासाठी विजयने घेणार तब्बल 100 कोटी
'मास्टर' फेम अभिनेता विजय 'महर्षी' फेम दिग्दर्शक वामसी पेदिपल्लींच्या आगामी चित्रपटात झळकणार असून चित्रपटाचे नाव 'थालापती 66' असेल. आता ताज्या वृत्तानुसार, या चित्रपटासाठी विजयने तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेणार असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप चित्रपटाची अधिकृत घोषणा व्हायची आहे. पण त्यापूर्वीच विजयला 10 कोटी रुपये सायनिंग अमाउंट म्हणून देण्यात आले आहेत. निर्माते दिल राजू या चित्रपटाची घोषणा कोविडची परिस्थिती सुधारल्यानंतर एका कार्यक्रमात करणार आहेत. पुढील वर्षी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.

3. अक्षय कुमार पोहोचला काश्मीरमधील बीएसएफ कॅम्पवर, नीरू गावात असलेल्या शाळेसाठी एक कोटींची आर्थिक मदत केली जाहीर
अभिनेता अक्षय कुमार सध्या काश्मीरमध्ये आहे. त्याने गुरुवारी भारतीय सेना, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांची बांदीपुरा जिल्ह्यातील गुरेज खो-यातील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या नीरू गावात जाऊन भेट घेतली. तिथे त्याने बीएसएफ आणि भारतीय सैन्यातील जवानांशी संवाद साधला. यावेळी संपूर्ण देश त्यांच्यासोबत असल्याचे सांगत जवानांचा उत्साह वाढवला. इतकेच नाही तर अक्षयने जवानांसोबत भांगडा देखील केला. याचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. जवानांना भेटण्याआधी अक्षय कुमारने बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना यांच्यासोबत शहीद झालेल्या जवानांना स्मृतिस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. या भेटीवेळी अक्षय कुमारने नीरू गावात असलेल्या शाळेसाठी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या आर्थिक मदतीमधून शाळेची इमारत उभारली जाणार आहे. अक्षयने ही मदत जाहीर केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याचे आभार मानले आहेत.

4. आगामी ‘RRR’साठी आलिया भट्टने घेतले सहा कोटींचे मानधन
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच एस. एस. राजमौलींच्या आगामी ‘RRR’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून आलिया दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात आलिया ‘सीता’ ही भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील तिचा लूक सोशल मीडियावर चर्चेत देखील होता. वृत्तानुसार, या चित्रपटासाठी आलियाने सहा कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जाते. हे मानधन टॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त असल्याचे म्हटले जात आहे.

5. किआराला साकारायची आहे मधुबालाची भूमिका
बॉलिवूड अभिनेत्री किआरा आडवाणी हिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन सात वर्षे पूर्ण झाली आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर एक लाइव्ह सेशल घेतले होते. यावेळी तिने आपल्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. या लाइव्ह सेशन दरम्यान तिच्या एका फॅनने भविष्यात एखाद्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर तिला कुणाची भूमिका करायला आवडेल, असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना कियारा म्हणाली, 'मला मधूबालाची भूमिका साकारण्याची खूप इच्छा आहे,' असे ती म्हणाली. तसेच हे तिचे स्वप्न असल्याचे देखील तिने यावेळी सांगितले. किआराने हे लाइव्ह सेशन तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. किआराने 13 जून 2014 रोजी ‘फगली’ चित्रपटातून डेब्यू केले होते. किआराचे बॉलिवूडमधले ग्लॅमरस 7 वर्षे सेलिब्रेट करण्यासाठी इंस्टाग्रामवरील तिचे एकूण 40 फॅन पेज एकत्र आले होते.

बातम्या आणखी आहेत...