आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थिएटरमध्ये येत आहेत दोन मोठे चित्रपट:होळीच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' तर एप्रिलमध्ये रणवीर सिंहचा '83' थिएटरमध्ये होऊ शकतात प्रदर्शित

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षय प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणू शकतो

लॉकडाउननंतर चित्रपटगृहात मोठ्या चित्रपटांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रेक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. रिलायन्स एन्टरटेन्मेन्ट त्यांचे दोन मोठे चित्रपट अर्थातच अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' आणि रणवीर सिंह स्टारर '83' हे मार्च आणि एप्रिलमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत आहे. सर्व काही व्यवस्थित राहिले तर होळीच्या निमित्ताने प्रेक्षकांना 'सूर्यवंशी' थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळू शकतो.

अक्षय प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणू शकतो
सूत्रांनी सांगितले की, "रिलायन्स एन्टरटेन्मेन्ट यावर्षी होळीच्या निमित्ताने 'सूर्यवंशी' हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखत आहे. आधीच, चित्रपटाची टीम मूळ रिलीजच्या तारखेपासून एक वर्ष मागे आहे. त्यांना अजून चित्रपट लांबणीवर टाकण्याची इच्छा नाही. अक्षय कुमार पुन्हा एकदा प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणू शकेल अशी त्यांना आशा आहे. अक्षयनंतर ते रणवीर सिंहला पडद्यावर आणणार आहेत.'

रिअल क्रिकेटर्स करु शकतात '83' चे प्रमोशन
सूत्रांनी पुढे सांगितल्यानुसार, '83' या चित्रपटाच्या प्रमोशनला अद्याप सुरुवात झालेली नाही. निर्मात्यांनी फक्त चित्रपटाचे पोस्ट लाँच केले आहे. अद्याप कोणताही टीझर किंवा ट्रेलर लाँच झालेला नाही. निर्मात्यांना 1983 च्या वर्ल्ड कपलशी संबंधित ख-या क्रिकेटपटूंना प्रमोशनमध्ये सामील करुन घ्यायची इच्छा आहे. अर्थात यास आणखी थोडा वेळ लागू शकतो.

चित्रपट वितरकांनी सलमान खानकडे त्याचा 'राधे: योअर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट थिएटरमध्ये आणण्याचा आग्रह धरला आहे. हे बघता अक्षय कुमार आणि रणवीर सिंह यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकतील अशी निर्मात्यांना आशा आहे.

'83' एप्रिलमध्ये मोठ्या स्क्रीनवर येऊ शकतो

दिव्य मराठीशी बोलताना व्यापार विश्लेषक कोमल नाहटा म्हणाले, "मागील वर्षाचे प्रदर्शनाचे वेळापत्रक लक्षात घेऊन यावर्षी दोन्ही चित्रपटांचे रिलीज शेड्यूल तयार केले गेले आहे. 'सूर्यवंशी' मार्चमध्ये आणि त्यापाठोपाठ एप्रिलमध्ये '83 'प्रदर्शित होईल. योजनेनुसार, रणवीर सिंहचा चित्रपट एप्रिलच्या अखेरीस पडद्यावर यायला हवा. अक्षय कुमार आणि रणवीर सिंह हे दोघेही चित्रपटगृहात प्रेक्षकांना आणू शकतील अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे."

दोन्ही चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होते
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' 24 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त कतरिना कैफ, अजय देवगण, रणवीर सिंह आणि गुलशन ग्रोव्हर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर कबीर खान दिग्दर्शित '83' या चित्रपटाची रिलीज डेट यापूर्वी 10 एप्रिल 2020 ही निश्चित करण्यात आली होती. या चित्रपटात रणवीर सिंहसह दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन आणि बोमन इराणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...