आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॅक टू वर्क:देशाबाहेर चित्रीत होणारा पहिला चित्रपट असेल अक्षयचा 'बेलबॉटम', ऑगस्ट 2020 मध्ये यूकेत होणार चित्रीकरणाला सुरुवात

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑगस्ट 2020 पासून यूकेमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

लॉकडाऊन संपले आहे. पोस्ट प्रोडक्शन, टीव्ही शोच्या शूटिंगनंतर आता चित्रपटांचे शूटिंगही सुरू होत आहे. अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘बेलबॉटम’ या चित्रपटाच्या शूटिंगची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एंटरटेन्मेंट इंडस्ट्री बंद पडली होती. पण आता लॉकडाऊननंतर अक्षय कुमारचा हा चित्रपट देशाबाहेर चित्रीत होणारा पहिला चित्रपट आहे, ऑगस्ट 2020 पासून यूकेमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

  • पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये होणार रिलीज 

बेलबॉटम हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित एक स्पाय थ्रिलर आहे. अलीकडेच वाणी कपूर या चित्रपटात झळकणार असल्याची बातमी आली होती. अक्षय कुमारव्यतिरिक्त वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ताही या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित एम तिवारी करत आहेत. वासु भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिषा आडवाणी, मधु भोजवानी, निखिल आडवाणी आणि जॅकी भगनानी या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची रिलीज डेट 2 एप्रिल 2021 ही निश्चित करण्यात आली आहे.

  • 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी 

कोरोनामुळे 23 मार्चपासून भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांवर बंदी घातली आहे. 4 जुलै रोजी सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 जुलैपर्यंत वाढविली आहे. यापूर्वी त्यावर 15 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली होती. डीजीसीएच्या आदेशानुसार या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय कार्गो फ्लाइट्स आणि विशेष उड्डाणांवर परिणाम होणार नाही. अशा परिस्थितीत आता चित्रीकरण पोस्टपोन होण्याची शक्यता कमी आहे.

0