आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांचा धसका:अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' आता मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार नाही

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षभरात सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता म्हणून अक्षय कुमारला ओळखले जाते. पण सध्या अक्षयच्या करिअरला उतरती कळा लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत आहेत. त्यामुळे नेटकरी सुद्धा त्याच्यावर टीका करत आहेत, त्याला इंडस्ट्रीमधून रिटायर होण्याचा सल्ला देत आहे. अशातच आता अक्षयने त्याचा आगामी चित्रपट 'ओह माय गॉड 2' बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

अक्षयचे अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेले अतरंगी रे, सम्राट पृथ्वीराज, राम सेतू, बच्चन पांडे, सेल्फी, रक्षाबंधन, अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. करिअरला लागलेली उतरती कळा बघून अक्षयने त्याच्या आगामी चित्रपटाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने त्याचा बहुप्रतिक्षित 'ओह माय गॉड 2' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कुठे रिलीज होणार हा चित्रपट, जाणून घेऊया-

'ओह माय गॉड 2' थेट OTT वर रिलीज होणार!
अक्षय कुमारला बॉलिवूड इंडस्ट्रीचा 'खिलाडी' देखील म्हटले जाते. प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत कसे खेचायचे हे त्याला चांगलेच माहित आहे. अक्षयने त्याच्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून फ्लॉप चित्रपटांचा ठपका त्याच्यावर बसला आहे. हे पाहता खिलाडी कुमारने त्याच्या 'ओह माय गॉड' या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल 'ओह माय गॉड 2' बॉक्स ऑफिसऐवजी ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

Voot किंवा Jio वर रिलीज होणार आहे 'ओह माय गॉड 2'
वृत्तानुसार, अक्षय कुमार स्टारर 'ओह माय गॉड 2' चे निर्माते डायरेक्ट-टू-डिजिटल रिलीजच्या पर्यायावर विचार करत आहेत. निर्माते हा चित्रपट Voot किंवा Jio या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेत आहेत. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अक्षय कुमार या चित्रपटाचा निर्माता आहे
'ओह माय गॉड 2' बद्दल बोलायचे झाले तर अमित राय हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. तर अश्विन वर्दे आणि अक्षय कुमार हे त्याचे निर्माते आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत पंकज त्रिपाठी, अरुण गोविल आणि यामी गौतम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

'ओह माय गॉड 2'मधील अक्षय कुमारचा लूक
'ओह माय गॉड 2'मधील अक्षय कुमारचा लूक

भारतीय शिक्षण पद्धतीवर आधारित असेल कथा!
'ओह माय गॉड 2' हा 2012 मध्ये आलेल्या 'ओह माय गॉड' चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट हिट ठरला आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तर आता 'ओह माय गॉड 2' ची कथा भारतीय शिक्षण व्यवस्थेवर आधारित असेल, असे वृत्त आहे.

'ओह माय गॉड 2'मध्ये अक्षयसह पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे.
'ओह माय गॉड 2'मध्ये अक्षयसह पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे.

अक्षयने स्वीकारली होती फ्लॉप चित्रपटांची जबाबदारी
अक्षय कुमारचा रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' चित्रपट शेवटचा हिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 198 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यास यश मिळवले होते. त्यानंतर मात्र अक्षयच्या आयुष्यात फ्लॉप चित्रपटांचा सपाटा लागला. काही महिन्यांपूर्वी अक्षयने आपल्या फ्लॉप चित्रपटांबद्दल मनोगत व्यक्त केले होते. तो म्हणाला होता, 'हे माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत नाही. मी माझ्या करिअरमध्ये आधी सुद्धा एकापाठोपाठ एक असे 16 चित्रपट फ्लॉप दिले होते. त्यानंतर काही कालावधीने पुन्हा माझे 8 चित्रपट सलग फ्लॉप झाले. आणि आता पुन्हा एकदा माझे 3/4 चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवण्यास नापास झाले. या सगळ्यामागे माझी चूक आहे. चित्रपट न चालणे हा माझ्या चुकीचा भाग आहे. आता प्रेक्षक वर्ग बदलत आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा बदलायला हवे. त्यांच्या गरजा बदलल्या आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा त्याच प्रकारे काम करणे गरजेचे आहे.'

बातम्या आणखी आहेत...