आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'रक्षाबंधन' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. खुद्द अक्षयने याबाबतचा एक छोटा व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत अक्षयने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचीही माहिती दिली आहे. हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला आहे.
11 ऑगस्टला सिनेमागृहात दाखल होणार आहे 'रक्षाबंधन'
व्हिडिओ शेअर करत अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले, "तुमच्या सर्वांसाठी एक अशी कहाणी घेऊन येत आहे, ज्यामध्ये सर्वात मजबूत आणि सुंदर नाते दाखवले जाईल. जे पाहून तुम्हाला तुमचे नाते कायम लक्षात राहिल. 'रक्षाबंधन' 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. रिटर्न टू फिलिंग्स." असे अक्षयने म्हटले आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये चित्रपटाचा टायटल लोगो आणि संगीत देखील ऐकू येतंय .
'लाल सिंह चड्ढा'शी होणार आहे 'रक्षाबंधन'ची टक्कर
'रक्षाबंधन'ची रिलीज डेट समोर आल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'सोबत टक्कर देणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. कारण, 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपटदेखील 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. अशा परिस्थितीत बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांमध्ये जोरदार लढत होणार आहे. आता अक्षय आणि आमिरचा कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो हे पाहायचे आहे.
अक्षय कुमार व्यतिरिक्त भूमी पेडणेकर देखील 'रक्षाबंधन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा हिमांशू शर्मा आणि कनिका ढिल्लन यांनी लिहिली आहे. कलर येलो प्रॉडक्शन, झी स्टुडिओ, अलका हिरानंदावी आणि केप ऑफ गुड फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अक्षयने गेल्यावर्षी या चित्रपटाची घोषणा केली होती आणि हा चित्रपट त्याच्या बहिणीला समर्पित असल्याचे त्याने म्हटले होते. अक्षयने ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. आता लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.