आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचा बिझी खिलाडी:अक्षय कुमारने 21 जून रोजी सुरु केले 'रक्षाबंधन'चे चित्रीकरण, तर 23 जून रोजी ‘पृथ्वीराज’चे बोल्ट ऑन ट्रॅक शेड्यूल केले पूर्ण

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • ‘पृथ्वीराज’साठी अक्षय कुमारने 21 किलोचे चिलखत घालून केले शूटिंग

अक्षय कुमार कोराेनाच्या या काळातही आपल्या चित्रपटाचे शूटिंग वेगाने पूर्ण करत आहे. 21 जून रोजी त्याने आनंद एल रायच्या रक्षाबंधनचे शूटिंग सुरू केले आहे. तर 23 जून येता-येता त्याने यशराज बॅनरच्या 'पृथ्वीराज'चे शूटिंग पूर्ण केले. चित्रपटाच्या सूत्रांनुसार, चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे संपादनदेखील पूर्ण झाले आहे. आता व्हीएफएक्सच्या भागावर काम सुरू आहे. निर्माते हा चित्रपट यावर्षी दिवाळीला प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत.

 • व्हीएफएक्स वर्क पाहाता पूर्ण केले बोल्ट ऑन ट्रॅक शेड्यूल

सेटवरील उपस्थित क्रू मेंबर्सने माहिती दिली, अक्षयने व्हीएफएक्स वर्क पाहाता बोल्ट ऑन ट्रॅक शेड्यूल पूर्ण केले. बोल्ट शूट म्हणजे एखाद्या परिस्थितीत अभिनेता कोणत्याही कारणामुळे सेटवर उपस्थित राहू शकला नाही तर तेव्हा या दृश्याचा वापर केला जातो. कारण 18 जूनपासून अक्षय कुमार ‘रक्षाबंधन’च्या तयारीत लागणार आहे. त्यामुळे त्याने 11 जूननंतर तीन ते चार दिवसांत आपले पूर्ण शूटिंग केले. त्यानंतर बोल्ट शूटच्या माध्यमातून 23 जूनपर्यंत त्याचे दृश्य चित्रीत करण्यात आले. अक्षयच्या व्यतिरिक्त सोनू सूदनेदेखील त्याचे शूटिंग पूर्ण केले.

 • मानुषीने आधीच पूर्ण केले आपल्या वाट्याचे शूटिंग

दुसरीकडे मुख्य भूमिकेत असलेली मानुषी छिल्लरने आधीच आपले शूटिंग पूर्ण केले होते. निर्मात्याने याचे बहुतांश शूटिंग स्टुडिओमध्ये केले आहे. एका दिवसाचे शेड्युल फक्त फिल्मसिटीच्या हेलिपॅडमध्ये चित्रित करण्यात आले.

 • ऑगस्टमध्ये सुरू करणार ‘मिशन लायन’

याखेरीज अक्षय ऑगस्टपासून त्याच्या पुढच्या ‘मिशन लायन’ या चित्रपटावर काम सुरू करणार असल्याचे ऐकले आहे. त्याचे शूटिंग यूकेमध्ये सुरू होईल. याशिवाय अक्षयच्या हातात अनेक प्रकल्प आहेत. ‘मिशन लायन’ नंतर तो ‘ओह माय गॉड 2’ वर काम करण्यास सुरवात करणार आहे. यानंतर सुभाष कपूर यांचा पुढचा चित्रपट यूकेमध्ये तयार होणार आहे.

 • जयपूरपासून 250 किलोमीटर दूर धौला गावात चित्रित केले युद्धाचे दृश्य

युद्धाच्या दृश्यांसाठी टीम जयपूरपासून 250 किलोमीटर दूर धौला गावात गेली होती. युद्धाचे दृश्य शूट करण्याची निर्मात्यांची वेगवेगळी कारणे होती. त्या दृश्यात डझनभर हत्ती घोड्यांसोबत अक्षय, सोनू, संजय दत्त व इतर कलाकारांचे अॅक्शन दृश्य चित्रित करण्यात आली. यासाठी परदेशातून तज्ज्ञ घोडेस्वारांना बोलावण्यात आले होते.

चित्रपटाविषयी काही खास माहिती

 • ‘पृथ्वीराज’ अक्षयच्या करिअरमधील पहिला चित्रपट ठरला, ज्याच्या शूटिंगसाठी 110 दिवस लागले. नाही तर तो आपले चित्रपट 30 ते 40 दिवसांत पूर्ण करुन टाकतो.
 • मानुष नंदन याचे सिनेमॅटोग्राफर आहेत. यापूर्वी त्यांनी ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ आणि ‘गुंजन सक्सेना’मध्ये काम केले होते.
 • चित्रपटाच्या युद्धातील दृश्य वगळता सर्व दृश्याचे शूट स्टुडिओमध्ये करण्यात आले.
 • ‘पृथ्वीराज’वर जी तंत्रज्ञ टीम काम करत होती तिने यापूर्वी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’वर काम केले आहे.
 • साऊथ अफ्रिकेचे स्टंट डायरेक्टर फ्रांज स्पिलहॉसने चित्रपटासाठी अक्षयची अॅक्शन सीन तयार केले होते. त्यांनी आधी ‘शमशेरा’ आणि ‘वॉर’वर देखील काम केले आहे.
 • चित्रपटासाठी कोरिअोग्राफर वैभवी मर्चंटने वीररसाच्या गाण्यानुसार अक्षयच्या दृश्याचे कोरिअोग्राफ केले.
बातम्या आणखी आहेत...