आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा दिसला अक्षय कुमारच्या मनाचा मोठेपणा:बिहार आणि आसाममधील पूरग्रस्तांना देणार एक-एक कोटीची मदत , दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आभार

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
फोर्ब्सच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार, अक्षय कुमार 2020 मधील सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड अभिनेता आहे.  - Divya Marathi
फोर्ब्सच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार, अक्षय कुमार 2020 मधील सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड अभिनेता आहे. 
 • अक्षय कुमारने 13 ऑगस्ट रोजी बिहार आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी बातचीत करुन त्यांना मदतीचा हात पुढे केला.
 • कोरोना काळात अक्षय कुमारने पीएम केयर्स फंडसह अनेक संस्थांना कोट्यवधींची मदत केली आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच आपल्या देशभक्ती आणि सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो. अक्षयने आसाम आणि बिहारच्या पुरग्रस्तांना प्रत्येकी एक कोटीची मदत केली आहे. 13 ऑगस्ट रोजी अक्षयने या संदर्भात दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या मदतीसाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचे आभार मानले आहेत.

 • कोरोना काळात अक्षयने दिला मदतीचा हात

यापूर्वी अक्षय कुमारने कोविड -19 चा लढा लढण्यासाठी पीएम केअर्स फंडामध्ये 25 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. याशिवाय त्याने मास्क, पीपीई आणि रॅपिड फायर किट्स खरेदी करण्यासाठी बीएमसीला 3 कोटी रुपये दिले. त्याने मुंबई पोलिस फाऊंडेशनमध्ये दोन कोटींची मदत केली. इतकेच नव्हे तर दैनंदिन मजुरांच्या मदतीसाठी सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा) ला 45 लाख रुपये दिले.

अक्षय यापूर्वी बर्‍याचदा मदतीसाठी पुढे आला आहे

 • जानेवारी 2017 मध्ये अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने सांगितले होते की, शहीद कुटुंबांसाठी अशी एक वेबसाइट किंवा मोबाईल अ‍ॅप आणायचा आहे, ज्याद्वारे सर्वसामान्य नागरिकही शहीद कुटुंबियांना मदत करू शकतील. यानंतर, त्याने गृह मंत्रालयात जाऊन तेथील अधिका-यांशी यासंदर्भात चर्चा केली आणि अडीच महिन्यांनंतर त्याचे हे स्वप्न साकार झाले. एप्रिल 2017 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने 'भारत के वीर' मोबाइल अॅप आणि पोर्टल सुरू केले. ज्याद्वारे देशातील कोणताही नागरिक सैनिकांना मदत करण्यासाठी 1 रुपयांपासून ते त्याच्या क्षमतेनुसार रक्कम दान करू शकतो. ही रक्कम शहीदांचे कुटुंब आणि सैन्याच्या मदतीसाठी वापरली जाते.
 • फेब्रुवारी 2019 मध्ये जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 हून अधिक सैनिक ठार झाले होते. या हल्ल्यानंतर अक्षयने गृह मंत्रालयाच्या वतीने फंड जमा करण्यासाठी तयार केलेल्या भारत के वीर ट्रस्टला 5 कोटी रुपयांची देणगी दिली होती.
 • जुलै 2019 मध्ये आसाममध्ये भीषण पुरामुळे विनाश झाला होता. त्यावेळी अक्षयने चीफ मिनिस्टर रिलीफ फंड आणि काजीरंग नॅशनल पार्कसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये दान केले होते. यावेळी अक्षयने इतरांनाही दान करण्याचे आवाहन केले होते.
 • 2018 मध्ये केरळमध्ये भीषण पूर आला होता, त्यावेळीही अक्षय कुमार पुढा आले आणि त्याने मुख्यमंत्री मदत निधीसाठी दान केले होते. त्याने मदतीचा चेक आपला मित्र प्रियदर्शन याच्या हस्ते केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांना पाठवला होता. परंतु, त्याने किती रक्कम दान केली, याचा खुलासा केला नव्हता.
 • मार्च 2020 मध्ये, अक्षयने चेन्नईमध्ये बांधल्या जाणा-या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर निवारा गृहासाठी 1.5 कोटी रुपये दिले होते. ट्रान्सजेंडर्सवर बनवलेल्या 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटातही तो काम करत आहे. ज्याचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स आहेत.
 • मे 2019 मध्ये झालेल्या फॅनी वादळामुळे देशातील विविध किनारपट्टी भागात हाहाकार माजला होता. ओडिशाला यामुळे सर्वाधिक नुकसान झाले, त्यावेळीसुद्धा अक्षय कुमारने सीएम रिलीफ फंडाला 1 कोटी रुपयांची देणगी दिली.
 • डिसेंबर 2015 मध्ये चेन्नईच आलेल्या भीषण पूरामुळेही हाहाकार माजला होता. त्यावेळी अक्षयने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या भूमिका ट्रस्टला 1 कोटी रुपयांची देणगी दिली होती.
 • पुलवामा हल्ल्यात हुतात्म्यांना 5 कोटी देण्याव्यतिरिक्त अक्षयने या हल्ल्यात शहीद झालेल्या जीत राम गुर्जर यांच्या पत्नी सुंदरी देवी यांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. जीत राम हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमवणारे व्यक्ती होते. ही रक्कम अक्षयने भारत के वीर ट्रस्टच्या माध्यमातून दिली होती.

2020 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड अभिनेता

अलीकडेच, फोर्ब्स मासिकाने 2020 मधील जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या कलाकारांची यादी जाहीर केली. या यादीत बॉलिवूडमधून एकट्या अक्षय कुमारला स्थान मिळाले आहे. त्याची कमाई 36२ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते आणि या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. कमाईच्या बाबतीत त्याने लिन मॅन्युएल, विल स्मिथ, अ‍ॅडम सँडलर आणि जॅकी चॅन या परदेशी कलाकारांना मागे टाकले आहे. असे म्हटले जात आहे की, त्याची ही कमाई बर्‍याच ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंटमधून झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...