आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपतींच्या भूमिकेत नेटक-यांनी अक्षयला नाकारले:म्हणाले - अक्षयलाच भूमिकेत घेण्याचा अट्टहास का?, ट्रोल होतोय अभिनेता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो वादात सापडला आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. मंगळवारी मुंबईत या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. स्वतः अक्षयने एक सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. यासोबतच त्याने छत्रपती शिवरायांच्या रुपातील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. अक्षयचा हा लूक पाहून काहींनी त्याचे कौतुक केले तर काहींना मात्र त्याचा हा लूक आवडला नाही.

अनेकांनी यावर कमेंट करत अक्षय छत्रपतींच्या भूमिकेत शोभत नसल्याचे म्हटले आहे. काहींनी अजय देवगण, शरद केळकरच शोभतात असे म्हटले आहे. अनेकांनी मराठी कलाकारच हवा होता असेदेखील म्हटले आहे.

अक्षयला ट्रोल करत आहेत नेटकरी

अक्षयने इन्स्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केला आहेत, यात तो कॅमेर्‍याच्या दिशेने चालताना दिसत आहे. या पोस्टवर त्याने 'जय भवानी, जय शिवाजी' असे कॅप्शन दिले. त्याच्या या व्हिडिओला आता अनेकजण ट्रोल करत आहेत. एकाने लिहिले की, 'छाती फुलवून चाल आणि चेहऱ्यावर तेजस्वी भाव असू देत. दबकत चालू नकोस. अशा प्रकारे चालत छत्रपतींचा अपमान करू नको.' शरद केळकरसारखा तगडा पर्याय उपलब्ध असताना अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत घेण्याचा अट्टहास का? असा सवालही काही जणांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे एक महत्त्वाची चूक काही नेटिझन्सनी लक्षात आणून दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावात चालणाऱ्या अक्षय कुमारच्या मागे बल्बचे झुंबर दिसत आहे. 'छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ ते १६८० या काळात साम्राज्य केलं. थॉमस एडिसनने १८८० मध्ये बल्बचा शोध लावला, मग हे कसे काय?' असा प्रश्न काही जणांनी विचारला आहे.

एकंदरीतच अक्षयला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक नाहीत. या चित्रपटात अक्षयसह प्रवीण तरडे, जय दुधाने, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. वसीम कुरेशी निर्मित, वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट मराठीसह, हिंदी, तामिळ आणि तेलगूमध्ये भाषेत पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...