आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार कायमच चर्चेत असतो. आता तो एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. अक्षयने त्याच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अक्षय भारताच्या नकाशावर चालत आहे. ‘नॉर्थ अमेरिका टूर’साठी हा प्रमोशन व्हिडिओ करण्यात आला आहे. पण आता या व्हि़डिओमुळे अक्षय नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आहे.
अक्षयने शेअर केला नॉर्थ अमेरिका टूरचा प्रमोशनल व्हिडिओ
अक्षयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अक्षयसह मौनी रॉय, दिशा पटानी, सोनम बाजवा आणि नोरा फतेही पृथ्वीवर चालताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत अक्षयने लिहिले, 'एंटरटेनर्स नॉर्थ अमेरिकेत 100 टक्के देसी मनोरंजनासाठी सज्ज आहेत. आपला सीट बेल्ट बांधा, आम्ही मार्चमध्ये येतोय.'
नेटकऱ्यांनी अक्षयने भारतीयांची माफी मागायला लावली
हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. “भारताचा थोडा तरी आदर करायचा होता”, असे एकाने म्हटले आहे.
तर दुसऱ्याने “लाज नाही वाटत का? भारतालाही नाही सोडले तू कॅनडियन कुमार”, असे ट्वीट केले आहे.
“ज्या देशात पैसा कमावला, त्याच देशाच्या नकाशावर पाय ठेवताना लाज वाटली नाही का?” असे म्हणत एकाने पंतप्रधान मोदींना टॅग करत यावर कारवाई करण्यास सांगितले आहे.
तर "या लज्जास्पद कृतीसाठी 150 कोटी भारतीयांची तू माफी मागायला हवी," असे एकाने म्हटले आहे.
आता यावर अक्षय काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.