आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बेलबॉटम'चा टीझर आऊट:RAW एजेंटच्या भूमिकेत अक्षय कुमार, रेट्रो लूकने वेधले लक्ष; रिलीजची तारीखही झाली निश्चित

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 30 सेकंदाच्या या टीझरची सुरुवात अक्षयच्या रेट्रो लूकने होते.

अक्षय कुमारच्या आगामी ‘बेलबॉटम’ या चित्रपटाचा टीझर सोमवारी प्रदर्शित झाला. 30 सेकंदाच्या या टीझरची सुरुवात अक्षयच्या रेट्रो लूकने होते. त्यानंतर अक्षय एका वेगळ्या लूकमध्ये दिसतोय. या चित्रपटात तो एका RAW एजेंटची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाचा टीझर पाहता आपण ऐंशीच्या दशकात पोहोचल्यासारखे वाटते.

पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल चित्रपटात अक्षयसह वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे शूटिंग स्कॉटलंड आणि लंडनमध्ये झाले आहे. तसेच लॉकडाउननंतर विदेशात शूट होणारा ‘बेल बॉटम’ हा पहिला चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 2 एप्रिल 2021 रोजी निश्चित करण्यात आली आहे.

कोरोनामुक्त राहिली पूर्ण कास्ट-क्रू

काही दिवसांपूर्वी स्कॉटलंडमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. कोरोनाच्या काळात चित्रीकरण करताना संपूर्ण क्रू आणि कास्ट कोरोनामुक्त राहिली. अतिशय सावधगिरीत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित एम तिवारी यांचे असून निर्मिती वासु-जॅकी भगनानी यांचे आहे. चित्रपटाची कथा असीम अरोरा आणि परवेझ शेख यांनी लिहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...