आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भूलभुलैया’ची 13 वर्षे:ऐश्वर्या आणि कतरिनाला होती पहिली पंसती,  चित्रपटासाठी विद्या बालनने घेतले होते विशेष कथकचे प्रशिक्षण

शब्दांकन : ज्योती शर्मा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 ऑक्टोबर 2007 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

2007 मध्ये बनलेल्या ‘भूलभुलैया’ या चित्रपटाला रिलीज होऊन नुकतीच 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त चित्रपटातील कलाकार मनोज जोशीसोबत झालेला खास संवाद..

''मी 'भूल भुलैया’मध्ये काम केले होते. प्रियदर्शनी सरांचे धन्यवाद मानतो. त्यांनी खूपच चांगली भूमिका दिली होती. यासोबतच मी टी-सिरीजचेही आभार मानतो. खूपच चांगला आणि यशस्वी चित्रपट ठरला होता. मला यात काम करण्यास खूपच मजा आली. एक मजेदार किस्सा सांगतो, अक्षयची ट्रेनर एक विदेशी महिला होती, ती त्यांना प्रशिक्षण द्यायची. त्यांच्यासोबत मिळून शायनी अहूजाने विद्या बालनसोबत एक गंमत केली होती, एक मोठी पत्रकार विद्याची मुलाखत घ्यायला आली, असे तिला सांगितले होते. मुलाखत घेतल्यानंतर विद्याला कळाले, ती पत्रकार नाही. संध्याकाळपर्यंत थोड्या-थोड्या वेळाने मुलाखत चालली मात्र विद्याला कळालेच नाही, माझ्यासोबत सर्वच गंमत करत आहेत. आम्ही सर्व त्या प्लॅनमध्ये सहभागी हाेतो आणि गंभीर होऊन सर्व काही पाहत हाेतो. सोमो पॅलेसमध्ये शूटिंग सुरू होती, तेथील हा किस्सा आहे.''

''प्रियदर्शनी सरांचा नेहमीच क्लियर कट थॉट असायचा. ते कधीच एकत्र शूट करत नाहीत. त्यांना जितके हवे असते ते तितकेच शूट करतात. आपल्या कामात ते खूपच शिस्तप्रिय आहेत. त्यांना जसे दृश्य पाहिजे तसे ते येऊन सांगतात. त्यांना हिंदी बोलता येत नाही मात्र कळते. कलाकारांवर विश्वास ठेवतात. मी त्यांच्यासोबत 10 ते 11 चित्रपट केले. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता.''

जाणून घ्या चित्रपटाशी संबंधित काही खास गोष्टी...

ऐश्वर्या-कतरिना होत्या पहिली पसंत

  • चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चन आणि कतरिना कैफ पहिली पसंत होती. मात्र त्यांच्या तारखा जुळल्या नसल्याने विद्या बालन आणि अमीषा पटेल यांची निवड करण्यात आली.
  • हा मल्याळम ‘मणिचित्राथाराझू’ चित्रपटाचा रिमेक होता.
  • विद्या बालनने चित्रपटासाठी विशेष कथकचे प्रशिक्षण घेतले होते. राणी मुखर्जीलादेखील विद्या बालनच्या भूमिकेसाठी विचारणा केली होती.
  • गाणाच्या 12 लाख यूनिट्सच्या विक्रीसह गाणे त्यावर्षीचे हिट गाणे ठरले होते. चित्रपटाचे संगीत प्रीतम चक्रवर्तीने कंपोज केले होते.
  • चित्रपटाचे शीर्षक गीत ‘भूल भुलैया’ कोरियन बँड जेटीएलचे गीत ‘माय लेकॉन’चे घेण्यात आले होते.
  • चित्रपटातील एक गीत ‘हरे राम’ रिलीजच्या एका आठवड्यानंतर जोडले होते. आधी ते फक्त चित्रपटाचे प्रमोशन गाणे होते.
  • सैफ अली खानला आदित्यच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले होते आणि शायनी आहुजाच्या भूमिकेसाठी अभिषेक बच्चनला विचारणा झाली होती. मात्र अभिषेकने नकार दिल्यानंतर शायनीला घेण्यात आले.
  • हा चित्रपट मनोज कुमारच्या ‘पूनम की रात’वर आधारित असल्याचेही बोलले जाते.
बातम्या आणखी आहेत...