आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीला पोहोचला अक्षय कुमार:'सेल्फी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर घेतले साईबाबांचे आशीर्वाद, चाहत्यांचीही भेट घेतली

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'सेल्फी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट जवळ आल्याने अक्षय चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान अक्षय शिर्डीला पोहोचला असून त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. शिर्डीत अक्षयने साईबाबांचे दर्शन घेतले आणि चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. यावेळी अक्षयची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यादरम्यान त्याने कारमधून उतरुन चाहत्यांची भेट घेतली.

चाहत्यांना आवडला 'सेल्फी'चा ट्रेलर
'सेल्फी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. तर अक्षय सुपरस्टार विजयच्या भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमध्ये अक्षय त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर इमरान आणि त्याचा मुलगा अक्षयसोबत सेल्फी घेण्याचे स्वप्न बघत असतात. आता इमरानचे हे स्वप्न पूर्ण होणार की नाही हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.

चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढील महिन्यात 24 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे इमरान हाश्मी दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

बातम्या आणखी आहेत...