आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अवतार 2' पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचला अक्षय:मुलगी नितारा होती सोबत, लेकीची काळजी घेताना दिसला खिलाडी कुमार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार त्याची मुलगी नितारासोबत अलीकडेच स्पॉट झाला. त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अक्षय आपल्या मुलीसोबत 'अवतार: द वे ऑफ वॉटर' हा हॉलिवूड चित्रपट पाहण्यासाठी पोहोचला होता. व्हिडिओमध्ये अक्षय कुमार निताराचा हात धरून चालताना दिसत आहे. यादरम्यान, अक्षय काळ्या रंगाची हुडी आणि जीन्समध्ये दिसला. यादरम्यान अक्षय आपल्या लेकीची काळजी घेताना दिसला. कारण पापाराझींच्या गर्दी तिच्याभोवती झाली होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमारचे 2022 मध्ये पाच चित्रपट रिलीज झाले आहेत. यामध्ये 'बच्चन पांडे', 'सम्राट पृथ्वीराज', 'रक्षा बंधन', 'कठपुतली' आणि 'राम सेतू' यांचा समावेश आहे. आता लवकरच तो 'बडे मियाँ छोटे मियाँ', सेल्फी', 'कॅप्सूल गिल', 'OMG 2', 'गोरखा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. पाहा व्हिडिओ...

  • खरे जहाज 47 कोटींचे, चित्रपट बनला 1250 कोटींत:टायटॅनिकच्या क्लायमॅक्ससाठी लागले 1 कोटी लिटर पाणी, चित्रपटाचा प्रत्येक मिनिट 8 कोटींचा

19 डिसेंबर 1997 रोजी प्रदर्शित झालेल्या टायटॅनिक या चित्रपटाला आता 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 11 ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा चित्रपट त्यावेळचा जगातील सर्वात महागडा चित्रपट होता. 1912 मध्ये साऊथॅम्प्टनहून पहिल्या आणि शेवटच्या प्रवासावर निघालेल्या आरएमएस टायटॅनिकवर हा चित्रपट आधारित होता. एपिक रोमान्स आणि ट्रॅजेडीवरील या चित्रपटाचे बजेट टायटॅनिक जहाजाच्या बांधणीसाठी आलेल्या खर्चापेक्षाही 26 पट जास्त होते. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक जेम्स कॅमेरून आहेत. जे अवतार, द टर्मिनेटर सारखे उत्कृष्ट चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. वाचा टायटॅनिकविषयीच्या रंजक गोष्टी...

  • भारतीय बॉक्स ऑफिसवर गाजतोय 'अवतार 2':अवघ्या तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, लवकरच 200 कोटी क्लबमध्ये एन्ट्री

जेम्स कॅमेरुन यांचा 'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा चित्रपटा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 2009 साली या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. आता 13 वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा चित्रपट जगभरात धमाका करत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आपली जादू दाखवली आहे. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...