आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये सिक्वेलचा ट्रेंड:'आवारा पागल दीवाना'च्या सिक्वेलमध्ये झळकणार अक्षय कुमार, हेदेखील आहेत बॉलिवूडचे आगामी सिक्वेल चित्रपट

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक नजर टाकुयात कोणकोणत्या चित्रपटांचे सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत यावर...

अक्षरा कुमार, शाहिद कपूर, रिमी सेन, आफताब शिवदासानी आणि सुनील शेट्टी स्टारर 'आवारा पागल दीवाना' या चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरू झाली आहे. निर्माता फिरोज नाडियाडवाला याचा
सिक्वेल घेऊन येत आहेत. 2002 मध्ये हा चित्रपट विक्रम भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता. तर मीटू प्रकरणात अडकलेला साजिद खान सिक्वेलच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असल्याची चर्चा आहे.
'आवारा पागल दीवाना'च्या अगोदरही इंडस्ट्रीमध्ये अनेक सिक्वेल चित्रपटांची तयारी जोरात सुरू आहे. चला तर मग एक नजर टाकुयात कोणकोणत्या चित्रपटांचे सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार
आहेत -

  • एक व्हिलन 2

2014 मध्ये रिलीज झालेला सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर स्टारर 'एक व्हिलन' या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येणार आहे. अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि दिशा पाटनी या सिक्वेलमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात संचारबंदी लागू आहे, त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाचे शूटिंग गोव्यात करण्याचा निर्णय घेतला असून सध्या येथे चित्रीकरण सुरु आहे.

  • हंगामा 2

अलीकडेच शिल्पा शेट्टी आणि परेश रावल यांनी त्यांच्या आगामी ‘हंगामा 2’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट 2003 चा सुपरहिट कॉमेडी ड्रामा 'हंगामा'चा सिक्वेल असणार आहे. मागील चित्रपटात रिमी सेन, आफताब शिवदासानी, अक्षय खन्ना, परेश रावल, शोमा आनंद आणि राजपाल यादव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. आता चित्रपटाची लीड कास्ट बदलण्यात आली आहे. सिक्वेलमध्ये जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जाफरी, दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणीता सुभाष, शिल्पा शेट्टी आणि परेश रावल यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाद्वारे शिल्पा शेट्टी मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे.

  • बंटी और बबली 2

'बंटी और बबली 2' हा आगामी क्राइम कॉमेडी चित्रपट असून 2005 मध्ये आलेल्या 'बंटी और बबली' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जीसह सिद्धांत चतुर्वेदी आणि नवोदित अभिनेत्री शरवरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2020 च्या अखेरीस प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आले आहे.

  • बधाई दो

भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांनी काही महिन्यांपूर्वी बधाई दोचे शूटिंग सुरू केले आहे. हा चित्रपट 2018 च्या बधाई हो या चित्रपटाचा सिक्वेल आहे, ज्यात आयुष्मान खुराणा आणि सान्या मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत होते. तर सिक्वेलमध्ये राजकुमार राव दिल्ली पोलिस अधिका-याची भूमिका साकारत आहेत, जो महिला पोलिस ठाण्यातील एकमेव पुरुष अधिकारी आहे.

  • भूल भुलैय्या 2

2007 साली रिलीज झालेल्या 'भूल भुलैय्या' या ब्लॉकबस्टर हॉरर कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता कार्तिक आर्यन या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये झळकणार आहे. भूल भुलैय्या 2 मध्ये कार्तिकसह किआरा आडवाणी दिसणार आहे. 31 जुलै 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मागील वर्षी मार्चमध्ये चित्रीकरणदेखील सुरु होते. मात्र कोरोनामुळे चित्रीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. हा चित्रपट अनीस बज्मी दिग्दर्शित करत आहेत.

  • दोस्ताना 2

2008 मध्ये आलेल्या 'दोस्ताना' या चित्रपटात प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आता यावर्षी या चित्रपटाचा सिक्वेल 'दोस्ताना 2' रिलीज होणार आहे. यात जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन आणि लक्ष्य लालवाणी मुख्य भूमिकेत आहेत. धर्मा प्रॉडक्शनचा हा चित्रपट हॉलिवूडचे दिग्दर्शक कोलिन डिचुन्हा दिग्दर्शित करत आहे. चित्रपटाचे पहिले शेड्युल पूर्ण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...