आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बेल बॉटम':अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ला सेन्सॉरकडून  U/A सर्टिफिकेट, जाणून घ्या कधी, केव्हा आणि कसा पहाता येईल हा चित्रपट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन नंतर हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे जो प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन बघू शकणार आहेत.

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी बहुचर्चित ‘बेल बॉटम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट येत्या गुरुवारी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लॉकडाऊन नंतर हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे जो प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन बघू शकणार आहेत.

सेन्सॉरने दिले U/A सर्टिफिकेट
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने ने हा चित्रपट झिरो कटसह पास केला आहे. एका सूत्राने सांगितले, "'बेल बॉटम' कोणत्याही कटशिवाय पास करण्यात आला आहे. खरं तर सीबीएफसी चित्रपटाच्या काही दृश्यांवर किंवा संवादांवर आक्षेप घेईल, असे वाटत होते. कारण हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. भारतीय अधिका-यांनी केलेल्या एका गुप्त ऑपरेशनशी संबंधित या चित्रपटाचे कथानक आहे. पण या चित्रपटावर सेन्सॉरची कात्री फिरली नाही."

सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट 2 तास 5 मिनिटांचा असेल. चित्रपटाची कथा 1984 च्या विमान अपहारावर आधारित आहे.

अक्षयने सांगितले - कसे करता येईल चित्रपटाचे बुकिंग
‘बेल बॉटम’ हा चित्रपट पाहाण्यासाठी आता तुम्ही अगोदर बुकिंग देखील करू शकतात. अक्षयने एक इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत काही लिंक शेअर केल्या आहेत. या लिंकवरुन तुम्ही चित्रपटाचे तिकीट आरक्षित करु शकतात असे त्याने त्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

या चित्रपटाची कथा असीम अरोरा आणि परवेज शेख यांनी लिहिली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन रणजीत एम तिवारी यांनी केले आहे. अक्षय या चित्रपटात रॉ एजंटच्या भूमिकेत आणि लारा दत्ता इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात हुमा कुरेशी, वाणी कपूर आणि आदिल हुसैन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...