आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठरलं तर...:OTT वर नव्हे तर चित्रपटगृहांतच प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा 'बेल बॉटम', चांगल्या तारखांच्या शोधात आहेत निर्माते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बेल बॉटम' हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो, अशी चर्चा होती.

अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'बेल बॉटम' या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागल्या होत्या. मात्र आता या चित्रपटाविषयीची एक मोठी बातमी समोर आली आहे. अक्षय कुमार, वाणी कपूर आणि लारा दत्ता स्टारर हा चित्रपट ओटीटी नव्हे तर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट निर्माते म्हणाले की, हा चित्रपट चित्रपटगृहांसाठी बनवला गेला आहे आणि तो चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित होईल. त्याचवेळी निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाच्या रिलीजची बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. चित्रपटाशी संबंधित संपूर्ण तपशील या महिन्याच्या अखेरीस समोर येईल. अक्षयचा हा चित्रपट रिलीज करण्यासाठी सध्या निर्माते चांगल्या तारखा शोधत आहेत.

काय होती चर्चा?
'बेल बॉटम' हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो, अशी चर्चा होती. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार बेल बॉटमचे निर्माते जॅकी भगनानी यांनी हा चित्रपट लवकर प्रदर्शित करण्यासाठी अ‍ॅमेझॉन प्राइमशी चर्चा सुरू केली होती, असे म्हटले गेले होते.

याआधीही अक्षयचा 'लक्ष्मी' चित्रपट हॉटस्टारवर रिलीज झाला होता. बेल बॉटम अक्षयचा हेरगिरी करणारा थ्रीलरपट आहे यात अक्षय स्टायलिश लूकमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.

लॉकडाउनमध्ये शूट करणारा अक्षय पहिला स्टार
लॉकडाउनमध्ये अक्षयने बेल बॉटमचे चित्रीकरण पूर्ण केले होते. अक्षय कुमार बॉलिवूडचा पहिला असा स्टार आहे, ज्याने कोरोनाच्या काळात स्कॉटलंडमध्ये आपल्या 'बेल बॉटम' चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. जगातील हा एकमेव असा चित्रपट आहे ज्याचे शूटिंग लॉकडाउनमध्ये सुरू झाले व लॉकडाउन संपले. चित्रपटातील कलाकार आणि क्रू यूकेला गेले होते. येथे मागील वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान त्यांनी चित्रीकरण पूर्ण केले होते.

बातम्या आणखी आहेत...