आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलबॉटम:20 सप्टेंबर रोजी OTT वर दाखल होणार अक्षय कुमारचा चित्रपट, सुमारे 75 कोटींना विकला गेले चित्रपटाचे हक्क

किरण जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेक्षक रिलीजच्या 4 आठवड्यांनंतर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतील

प्रदीर्घ कालावधीनंतर भारताच्या काही भागात चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाली आहेत. अक्षय कुमार स्टारर 'बेलबॉटम' हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आहे. 'बेलबॉटम'च्या रिलीजनंतर अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम आणि अंदमान सारख्या राज्यांमध्ये अक्षयचे चाहते थिएटरमध्ये चित्रपटाचा आनंद घेऊ शकत नाहीये. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप येथील चित्रपटगृहे बंद आहेत. पण या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे निर्मात्यांनी आता हा चित्रपट पुढील महिन्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रेक्षक रिलीजच्या 4 आठवड्यांनंतर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतील

चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने खुलासा केला आहे, "निर्मात्यांनी हा चित्रपट अमेझॉन प्राइमला सुमारे 75 कोटींना विकला आहे. साधारणपणे एखादा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 8 आठवड्यांनंतर ओटीटीवर येत असतो. पण बेलबॉटम त्याला अपवाद ठरला आहे. चित्रपट 19 ऑगस्टला प्रदर्शित झाला असून आता चार आठवड्यांनी तो ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यामुळे अमेझॉन प्राइमला चित्रपटासाठी मोठी रक्कम मोजावी लागली आहे. प्लानिंगनुसार हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी ओटीटीवर दाखल होईल.'

'बेलबॉटम' व्यतिरिक्त अमिताभ बच्चन आणि इम्रान हश्मी यांचा 'चेहरे', जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते 2', नुसरत भरुचा 'चोरी' आणि इम्रान हाश्मीचा 'एजरा' देखील पुढील दोन महिन्यांत अमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...