आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. वृद्धापकाळातील समस्यांमुळे त्यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील पाच दिवसांपासून आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनाची बातमी अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून दिली आहे. यात तो म्हणाला, 'ती माझा कणा होती आणि आज मला तिच्या जाण्याने अंतःकरणात असह्य वेदना होत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे आणि ती माझ्या वडिलांकडे दुसऱ्या जगात गेली आहे. या कठीण काळात माझ्या कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांना आदर करतो. ओम शांती.'
मुलाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी घेतला जगाचा कायमचा निरोप
मुलाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारचा वाढदिवस 9 सप्टेंबरला येतो. अक्षय त्याच्या आईच्या खूप जवळ होता. त्यांची प्रकृती ठिक नसल्याची बातमी मिळाल्यानंतर तो तातडीने चित्रीकरण अर्धवट सोडून सोमवारी मुंबईला परतला होता. अक्षय लंडनमध्ये त्याच्या आगामी 'सिंड्रेला' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेला होता.
मंगळवारी अक्षयने मानले होते चाहत्यांचे आभार
अक्षय कुमारने मंगळवारी चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असलेल्या चाहत्यांचे आभार मानले होते. या पोस्टमध्ये तो म्हणाला होता 'माझ्या आईच्या प्रकृतीबद्दल तुमची एवढी काळजी पाहून मी निशब्द झालो आहे. हा काळ मी आणि माझ्या कुटुंबासाठी हा काळ फार कठीण आहे. तुम्ही सगळ्यांची प्रार्थना खूप मदतीची ठरेल.'
अक्षयचे 9 प्रोजेक्ट्स आहेत पाइपलाइनमध्ये
अक्षय आईसोबत राहता यावे म्हणून सोमवारी मुंबईला परतला होता. मात्र त्याने 'सिंड्रेला' या चित्रपटाच्या निर्मात्यांना ज्या दृश्यांमध्ये त्याची गरज नाही, ती दृश्ये चित्रीत करावी असे सांगितले आहे. 77 वर्षीय अरुणा भाटिया यांचे काही वर्षांपूर्वी त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते. अरुणा या देखील चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांनी 'हॉलिडे'सह काही गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली होती. तर दुसरीकडे अक्षय कुमारचे पुढील वर्षीपर्यंत सुमारे अर्धा डझन चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. 'बेल बॉटम', 'सूर्यवंशी', 'अतरंगी रे', 'पृथ्वीराज', 'बच्चन पांडे', 'रक्षाबंधन', 'राम सेतु', 'OMG-ओह माय गॉड 2' आणि वेब सीरीज 'द एंड' हे त्याचे आगामी प्रोजेक्ट आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.