आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनचा साइड इफेक्ट:शूटिंग पूर्ण होण्यापूर्वीच तोडले जाणार आहेत 'पृथ्वीराज' चित्रपटाचे सेट्स, निर्मात्यांना देखरेखही परवडेना

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
सेटचे छायाचित्र मिड डेहून साभार - Divya Marathi
सेटचे छायाचित्र मिड डेहून साभार
  • हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार होता

मुंबईतील दहीसर येथे अक्षय कुमारच्या आगामी 'पृथ्वीराज' चित्रपटासाठी बनवण्यात आलेले सेट्स आता तोडले जाणार आहेत. कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे निर्मात्यांना पावसाळ्यापूर्वी येथे शूटिंगची कोणतीही आशा नाहीये. सेट्सचा मेंटेनन्सचा खर्च खूप महागात पडतोय. त्यामुळे यश राज फिल्म्सने (चित्रपटाची निर्मिती कंपनी) त्यांना तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

  • सेट दोन महिन्यांपासून तयार आहे

मिड-डेच्या रिपोर्टनुसार, प्रॉडक्शन हाऊसच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, "गेल्या दोन महिन्यांपासून यशराजने हा सेट कायम राहू दिला, कारण परिस्थिती लवकरच सुधारेल अशी अपेक्षा होती. तथापि, पावसाळ्यासाठी अजून काही आठवडे बाकी आहेत. त्यामुळे आणखी बरेच दिवस या सेट्सची देखरेख करणे आणि त्यासाठी पैसा खर्च करणे शक्य नाहीये. म्हणून निर्माता आता त्यांना तोडण्यासाठी आवश्यक परवानग्या घेत आहेत."अक्षयने सेटवर मोठे सिक्वेन्स शूट केले आहेत

रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, "अक्षय कुमारने 'पृथ्वीराज'च्या मोठ्या भागांचे दहिसरच्या सेटवर चित्रीकरण केले आहे. परंतु काही महत्त्वाचे सिक्वेन्स अजून बाकी आहेत. शूटिंग सुरू होताच यशराज हे सिक्वेन्स आता इंडोर शूट करणार आहे. दहिसरमध्ये दोन सेट बनवले गेले होते. एक राजवाड्याचा आणि दुसरा युद्धक्षेत्राचा, जेथे अॅक्शन सीन्स शूट करायचे होते."

  • हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार होता

चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित ‘पृथ्वीराज’ यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार होता. पण शूटिंग थांबल्यामुळे आता चित्रपट पुढील वर्षापर्यंत लांबणीवर पडला आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार राजपूत महाराजा पृथ्वीराज चौहान आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर त्यांची पत्नी संयोगिताच्या भूमिकेत आहे. मानव विज मोहम्मद गौरीची भूमिका साकारत आहे.

बातम्या आणखी आहेत...