आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधनाची खास भेट:5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' चित्रपट, अक्षय आणि त्याची बहीण अलकाच्या जीवनावर आधारित असू शकतो चित्रपट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आनंद एल राय 'रक्षाबंधन' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
  • हा चित्रपट पुढील वर्षी 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

आनंद एल राय आणि अक्षय कुमार या जोडीचा 'अतरंगी रे'नंतर आता 'रक्षाबंधन' हा आणखी एक चित्रपट येणार आहे. राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'अतरंगी रे'सह या चित्रपटाची कथादेखील आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा या जोडीने लिहिली आहे. या चित्रपटाची घोषणा स्वतः आनंद एल राय आणि अक्षय कुमार यांनी केली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होईल. आनंद म्हणाले, 'रक्षाबंधन' हा आमचा आणखी एक चित्रपट आहे. याची कथा खूप खास आहे. हा नात्यांचा उत्सव आहे.'

अक्षय कुमार म्हणाला, "जीवनात अशी क्वचितच एखादी कहाणी असते जी आपल्या अंतःकरणाला इतक्या खोलवर आणि सहजपणे स्पर्श करते. ही कहाणी आपल्याला हसवेल आणि रडवेल. ज्यांना बहिणी आहेत ती व्यक्ती किती धन्य आहे, याचा अनुभव हा चित्रपट देईल. मला सर्वात जास्त आनंद याचा आहे की माझी बहीण अलका दिग्दर्शक आनंद एल राय यांच्यासह या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.'

या चित्रपटामध्ये अक्षयच्या चार बहिणी असल्याचे ट्रेड पंडितांचे म्हणणे आहे. यात अक्षय आणि अलकाची रिअल लाइफ बॉन्डिंगदेखील दिसणार आहे. अक्षय कुमार आणि आनंद एल राय यांनी या लॉकडाऊनमध्ये हा चित्रपट फायनल केला. या दोघांमध्ये तीन चित्रपटांची डील झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...