आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा फ्लोअरवर येणार 'राम सेतु':अक्षय कुमार 20 जूनपासून मुंबईत सुरु करणार चित्रीकरण, काही अंडरवॉटर सीक्वेन्सचेही होणार शूटिंग

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीलंकेत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये शूटिंग होईल

जून महिन्यापासून फिल्म इंडस्ट्री पुन्हा कामावर परतणार आहे. 'विक्रम वेधा', 'असुर 2', 'मसाबा मसाबा 2' ची तयारी पूर्ण झाली आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’ चित्रपटाची शूटिंगही 20 जूनपासून सुरू होऊ शकते. निर्माते विक्रम मल्होत्रा ​​यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले, 'अक्षय कुमार आता कोविडपासून पूर्णपणे बरा झाला आहे. तो अगदी ठणठणीत आहे. सध्या मुंबईतच शुटिंग सुरू होणार आहे. सध्या तरी मुंबईबाहेर शूटिंग करण्याची कोणतीही योजना नाही. सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत जाण्याची शक्यता आहे,' असे त्यांनी सांगितले.

  • महिन्याभरापासून झूम कॉलवर होत आहेत प्रेझेंटेशन

चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की , 'मागील एका महिन्यापासून निर्माते, दिग्दर्शक आणि व्हीएफएक्स टीम झूम कॉलवर आपापले प्रेझेंटेशन शेअर करत आहेत. फिल्मसिटी येथे गुफांचे सेट तयार करण्यात आले आहेत. त्याद्वारे चित्रपटाचा नायक राम सेतूच्या ठिकाणी पोहोचलेला दाखवला जाईल. 'राम सेतु' हेवी व्हीएफएक्स असलेला चित्रपट असेल. चित्रपटात बरेच अंडरवॉटर सीक्वेन्स चित्रित केले जाणार आहेत. कलाकार पाण्याखाली जाऊन शूटिंग करतील.'

  • श्रीलंकेत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये शूटिंग होईल

चित्रपटाचे चित्रीकरण अनेक ठिकाणी केले जाणार होते. टीम ऊटीला देखील जाणार होती, परंतु कोविड परिस्थितीमुळे वेळापत्रक रद्द करावे लागले. कलाकार आणि क्रू मेंबर्स सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेला रवाना होतील. या चित्रपटात तामिळ फिल्म इंडस्ट्रीचा मोठा स्टारदेखील असणार आहे. पण सध्या त्याच्या नावावर गुप्तता बाळगण्यात आली आहे. सध्या तेलुगु अभिनेता सत्यदेवचे नाव समोर आले आहे.'

  • 'राम सेतू'च्या कथेला 2007 वर्षाची पार्श्वभूमी

क्रिएटिव्ह टीमने सांगितले की, 'चित्रपटाची कथा 2007 च्या पार्श्वभूमीवर आहे. चित्रपटाचा हीरो म्हणजे अक्षय कुमार हा पुरातत्वशास्त्रज्ञ आहे. नुसरत भरुचा त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. जॅकलिन फर्नांडिस पुरातत्वशास्त्रज्ञ अक्षयची टीम सदस्य आहे. अक्षयला ती राम सेतु या मिशनमध्ये मदत करते.

व्हीएफएक्सबरोबर या चित्रपटामध्ये अ‍ॅनिमेशनचे कामदेखील बरेच आहे. यासह अक्षय, जॅकलिन, नुसरत आणि सत्यदेवदेखील अंडरवॉटर सीक्वेन्ससाठी तयारी करणार आहेत. कोविड पॉझिटिव्ह होण्यापूर्वी अक्षयने मुंबईतील कांदिवली ईस्टच्या पॉलिटेक्निक कॉलेज आणि मड आयलँडवर काही सीन शूट केले होते. कांदिवली येथे पत्रकार परिषदेचे दृश्य चित्रीत करण्यात आले होते. तर मड आयलँडवर पती-पत्नी म्हणून अक्षय-नुसरतच्या घराचे सीक्वेन्स चित्रीत झाले होते.'

बातम्या आणखी आहेत...