आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना जागरुकता:लॉकडाऊनमध्ये केवळ 3 तासांत झाले होते अक्षय कुमारच्या शॉर्टफिल्मचे चित्रीकरण, सांगितले अनलॉकनंतर कामावर कसे जावे

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमध्ये 20 सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या पहिल्या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक आर बाल्की आहेत.
  • 25 मे रोजी कमालिस्तान स्टुडिओत शूटिंग अवघ्या तीन तासांत पूर्ण झाले.

65 दिवसांच्या लॉकडाऊननंतर, देशात हळूहळू अनलॉक होण्यास प्रारंभ झाला आहे. लोकांनी कामावर परतताना कोणती सावधगिरी बाळगायला हवी, यासाठी सरकारने जागरुकता निर्माण करणे सुरु केले आहे. अभिनेता अक्षय कुमार हा स्वच्छ भारत अभियानाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे आणि त्यासाठी सरकारने त्याची निवड केली आहे. अक्षयने आर. बाल्की यांच्या दिग्दर्शनाखाली एका लघु चित्रपटात काम केले असून, याच्या माध्यमातून सावधगिरीने कामावर परतण्याचा संदेश दिला गेला आहे. पीआयबीनेही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शॉर्टफिल्मची लिंक पोस्ट केली आहे.

या शॉर्ट फिल्ममध्ये काय दाखवण्यात आहे का?

या शॉर्टफिल्ममध्ये गावाचे सेटअप दाखवले गेले आहे. यात अक्षयने बबलू नावाच्या तरुणाची भूमिका साकारली असून तो मास्क घालून कामावर जाताना दिसतोय. त्याला बघून गावाचे प्रमुख त्याला लॉकडाऊन सुरु होताच फिरायला निघालास का?  साथीचा रोग पसरला आहे, असे म्हणतात. त्यावर अक्षय त्यांना म्हणतो, मी फिरायला नव्हे तर कामावर जातोय. यावर गावाचे प्रमुख तुला व्हायरलची लागण होईल, असे  सांगतात. 

अक्षय त्यांना म्हणतो- असे पुर्वी वाटायचे. पण आता योग्य ती सावधगिरी बाळगली तर हा आजार होण्याची शक्यता कमी आहे. मग बोलण्यात कोणती खबरदारी घ्यायला हवी हे सांगताना अक्षय म्हणतो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे मास्क घालावे, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे. आणि इतरांसोबत कमीतकमी दोन फुटाचे अंतर ठेवावे, असे अक्षय सांगतो.  

लॉकडाऊनमध्ये चित्रीत झालेली पहिली शॉर्ट फिल्म 

आर बाल्की यांनी ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित केली आहे. या चित्रीकरणासाठी 22 आणि 23 मे या दोन दिवसांसाठी परवानगी घेण्यात आली होती. पण अखेर 25 मे रोजी कमालिस्तान स्टुडिओत चित्रीकरण पूर्ण झाले. तेथे चित्रीकरण कसे झाले, किती क्रू मेंबर्स यावेळी हजर होते, याची माहिती शॉर्ट फिल्मचे निर्माते अनिल नायडू यांनी दिव्य मराठीसोबत शेअर केली होती. त्यांनी यापूर्वी बाल्की आणि अक्षय कुमारसोबत विविध प्रोजेक्टची निर्मिती केली आहे. 

ते म्हणाले होते, 'मंत्रालयाने यासाठी प्रथम अक्षय कुमार आणि आर बाल्की यांच्यासोबत संपर्क साधला. त्यानंतर या शॉर्ट फिल्मसाठी स्क्रिप्ट तयार केली गेली. त्यानंतर आम्ही मंत्रालयाला सांगितले की, आम्हाला शूटिंगसाठी परवानगी हवी. तर त्यांनी स्वत: मुंबई पोलिस आयुक्तांकडून परवानगी मागितली. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही 22 आणि 23 मे रोजी शूटिंगसाठी परवानगी मागितली होती. पण अखेर शूटिंग 25 मे रोजी झाले.

आम्ही ही शूटिंग केवळ अडीच ते 3 तासांत पूर्ण केली. सामान्यत: लॉकडाऊनपूर्वी सेटवर 60 ते 70 क्रू मेंबर्स असायचे, तर आम्ही फक्त 20 क्रू मेंबर्ससोबत शूट केले. अक्षय कुमार स्वत: गाडी चालवत सेटवर आला होता. सेटवर फक्त मेकअप मॅन होता आणि दुसरे क्रू मेंबर्स नव्हते. 

त्याचप्रमाणे सिनेमॅटोग्राफरदेखील एका कॅमेरा सहाय्यकासह आले. मी स्वत: सेटवर येताना बाल्की सरांना घ्यायला गेलो होतो. बाल्की सर यांच्यासोबतही खूप कमी असिस्टंट डायरेक्टर होते. संपूर्ण शूट दरम्यान कॉश्च्युम बदलण्यात आला नाही. शूटिंगच्या आदल्या दिवशी आम्ही अक्षयला कपडे पाठवले होते. त्याच कपड्यात तो सेटवर आला होता.

या शॉर्टफिल्ममध्ये अक्षय कुमारसोबत अतुल श्रीवास्तव झळकले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...