आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साता जन्माच्या गाठीत अडकले राणादा-पाठकबाई:नववधूची हार्दिकसाठी खास पोस्ट, म्हणाली - 'तुझ्यात जीव रंगला… कायमचा'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आज विवाहबंधनात अडकले आहेत. अतिशय थाटामाटात दोघांचा विवाह संपन्न झाला. पुण्यात दोघे साता जन्माच्या गाठीत अडकले. या लग्नसोहळ्याचे बरेच फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. लग्नानंतर नववधू अक्षयाने लग्नाचे खास फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.

या फोटोला अक्षयाने हटके कॅप्शन दिले आहे. 'रील ते रिअल… जादू कायम', असे कॅप्शन अक्षयाने फोटोला दिले आहे. सोबतच तिने #अहा असा हॅशटॅग शेअर करत हार्ट इमोजी शेअर केला आहे.

अक्षयाने लग्नातील तीन खास फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत हार्दिक अक्षयाला किस करत असल्याचे दिसत आहे. तर एका फोटोत हार्दिक अक्षयाला मंगळसूत्र घालतोय. एका फोटोत दोघे नवरा-बायको म्हणून दिसत आहेत.

या पोस्टनंतर अक्षयाने वरमाळेचा फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोला खूपच सुंदर असे कॅप्शन अक्षयाने दिले आहे. "2.12.2022 ❤️तुझ्यात जीव रंगला… कायमचा..!", असे कॅप्शन अक्षयाने दिले आहे. सोबतच तिने या फोटोसह #अहा हा हॅशटॅगदेखील शेअर केला आहे.

अक्षयाने लग्नात राणी कलरची नऊवारी परिधान केली आहे. या नऊवारीवर चंद्राकोर आहे. तिने गळ्यात ठुशी, चंद्रहार, नाकात नथ घातली आहे. या रुपात अक्षया खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोतही दिसत आहे. तर हार्दिकने सोनेरी रंगाचा अंगरखा परिधान केला. त्यावर अक्षयाच्या साडीसोबत जुळणारी शाल घेतली आहे. गळ्यात भलीमोठी रुद्राक्षांची माळ घातली आहे.

बातम्या आणखी आहेत...